यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे सट्टा मटका व देशी पंण्या हाटबत्ती दारू व्यवसाय खुलेआमपणे सुरु असल्याची जोरदार चर्चा .सट्टा व दारू जुगारामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त.होण्याच्या मार्गावर
जळगाव जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी प्रवीण मेघे
तालुक्यतील डोंगर कठोरा येथे बस स्टॉप परिसरात सट्टा दारू व्यवसाय बिनधास्त राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. या सट्टा मटका दारू जुगाराचे लोभामध्ये तरुण पिढी सह वयस्कर मंडळी व जेष्ठ नागरिक सट्टयाच्या व दारूच्याआहारी गेल्याने ह्या तरुण पीढीसह अनेकांचे संसार उद्धवस्त होतांना दिसत आहे .या सट्टा मटका जुगाराला व दारू भली मोठी मदत आणि चालना देण्याचे काम हे पोलिस प्रशासनाकडुन होत असल्याचे डोंगर कठोरा गावतल्या जनतेकडुन बोलले जात आहे. असल्याची परिसरातील जनतेकडुन जोरदार चर्चा सुरू आहे .
याकडे पोलीस प्रशासन कार्यवाही करेल का ? असा सवाल मात्र परिसरातील जनतेला आता खुप त्रास देऊ लागला आहे ..जेणे करून तरुण पिढी व वयस्कर लोक हे लोभापोटी बळी पडू नये. म्हणून तात्काळ तालुका पी . आय साहेब व जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सट्टा मटका व दारू मध्ये व्यसनाधिन झालेल्या सर्वसामान्य जनतेचे जीवन वाचवावे आणि ह्या संबंधीत गावात, सुरू असलेल्या सट्टा मटका पिढ्या दारू बंद कराव्या..अशी रास्त स्वरुपाची मागणी वरीष्ठ नागरिकांसह परिसरातील जनतेने पोलिस प्रशासनाकडे केली आहे..
