मी भारतीय
एक दीर्घाॅंक.
मनात देशभक्ती पर प्रेम जागृत करणारं नाटक.
प्रत्येक भारतीय व्यक्तीने मनापासून पाहायला हवं असं माझं मत आहे.
प्रतिनिधी. लव क्षीरसागर
आपल्याला आपल्या पुस्तकीं अभ्यासातून मोजक्याच आपल्या भारतीय देशातील थोर पुरुषाचीं माहिती मिळते तीही थोडी थोडकीच
काल श्री. शिवाजी नाट्य मंदिर च्या 209 व्या प्रयोग आम्ही बघितला तेव्हा खूप महत्वाच्या मोलाच्या गोष्टी या दीर्घानकातून समजल्या.
मी भारतीय दीर्घाॅंकांमध्ये अभिनय श्री. रवींद्र देवधर सर व ऋषिकेश कानडे यांनी उत्तम केलं आहे. संपूर्ण प्रयोगात त्या दोघांनी जबरदस्त सवांदानी स्थिर करून ठेवल्या मुळे आपण एकमग्न होऊन जातो.
आणि त्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला रिलेट होतात हे दिसून येतं.
कालच्या या प्रयोगाला बऱ्याच दिग्गज
मराठी जेष्ठ सिनेअभिनेते अरुण नलावडे सर, दिग्गज रंगकर्मी, श्री. अशोक मुळ्ये काका, अभिनेते, कांचन पगारे, लेखक, दिग्दर्शक, परीक्षक श्रीनिवास नार्वेकर सर, सांस्कृतिक कलादर्पणचे चंद्रशेखर सांडवे सर आणि श्री. शिवाजी नाट्य मंदिर चे ट्रस्टी, लेखक, विचारवंत श्री. ज्ञानेश महाराव सर अशा नामवंत मान्यवरांनीं
आपली हजेरी लावली होती.
मी भारतीय दीर्घाॅंकाचे
दिग्दर्शन, संकल्पना, अभिनेते श्री. रवींद्र देवधर,
लेखन प्रदीप तुंगारे, साउंड शिरीष कुलकर्णी, मेकअप, फोटोग्राफी श्रीकांत आगाशे, लाईट्स सिद्धेश नांदलस्कर, व्यवस्थापन नयना रहाळकर
आणि सहाय्यक, व्हिडीओ शूटिंग लव क्षीरसागर यांनी केले आहे….
संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाबद्दल
देशभक्ती प्रेम , ” मी एक भारतीय” म्हणून आपण हे नाटक नक्की पहायला हवे आणि जास्तीत जास्त लोकांनीं पाहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
ही अपेक्षा….
मी भारतीय
🇮🇳 जय हिंद 🇮🇳
