गुन्हे शाखा पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सराईत गुन्हेगाराकडुन ०३ पिस्टल व ०६ राऊंड केले जप्त
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
दि.०७/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अमंलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार तेलंगे पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे हा मुंबई बैंगलोर हायवे लगत, वडगाव पुणे येथे पिस्टल विक्री करीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली,
त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सादर ठिकाणी सापळा रचुन सराईत गुन्हेगार चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे वय २७ वर्षे रा. लेन नं.५ संतोषनगर कात्रज, पुणे हा सदर ठिकाणी येताच त्यास अंत्यत शिताफिणे ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एकुण ७६,३००/-रू. किं.चा ऐवज त्यामध्ये ७५,०००/-रु. किं. चे ०३ गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल, १२००/-रु.किं.चे ०६ जिवंत काडतुसे, व १००/-रू. किं.ची एक ढोलक बॅग असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने, त्याच्या विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३३८/२०२५. भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व गहाराष्ट्र. पो.का. १९५१ चे कलग ३७ (१) (२) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हयात सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, गा.पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर, पुणे शहर अति. कार्य गुन्हे, श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्नछत्रे, सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दयानंद तेलंगे पाटील, सर्जेराव सरगर, सचिन माळवे, संदिप शिर्के, विपुन गायकवाड, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, स्वानील मिसाळ यांनी केली आहे.
