अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
2023-24चा,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न समाजभुषण पुरस्कार रामकिशन कलवले यांना प्रदान
प्रतिनिधी: आदित्य चव्हाण
सन 2023 24 चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न समाजभुषण पुरस्कार रामकिशन कलवले यांना प्रदान करण्यात आला .दिनांक 10 जून 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित, “सन्मान कार्याचा, गौरव महाराष्ट्राचा” सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २०२३-२४ पुरस्काराचे वितरण सोहळा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात श्री रामकिशन मरिबा कलवले यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री. मा. श्री संजयजी शिरसाट, मा. श्री संजयजी राठोड, मा. मंत्री श्री भरतशेठ गोगावले व मा. श्री प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. रामकिशन कलवले हे शिवणे, पुणे येथील रहिवाशी. हे सामाजिक क्षेत्रात जसे की, दुर्बळ घटकातील महिला सक्षमीकरण, अंध l, अपंग, निराधार, विधवा l, गोर गरीब महिलांसाठी व शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच संस्थेसोबत अनेक वर्षांपासून निरंतरपणे समाजामध्ये सेवा देण्याचे कार्य निस्वार्थ भावणेने आणि प्रामाणिकपणे सक्रियपणे सामाजिक सेवा करत आहेत. त्यांच्या या महान सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय मानवसेवेच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने 2023-2024 या वर्षांचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पुरस्कारासाठी निवड झाली आणि हा बहुमोल पुरस्कार राज्याचे उप मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल इंडिया सोशल सर्विस सेंटर चे सचिव श्री. त्र्यंबक गडकरी व त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच जनविकास श्रमिक संस्था चे सचिव श्री नवनाथ गाडे, तानाजी शिरसट, हमीदसाब शेख, वर्षा निवांगुणे, रुबी, अश्विनी नायर, जनार्दन भाडगे, मनोहर गायकवाड, निकिता दहिरे, ह्या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच समर्थ पुरम, शिवणे सोसायटीचे मित्रमंडळी श्री. संतोष नाना देशमुख, श्री. महेश बोडके, श्री. शरद बनसोडे, श्री. उदय हांडे, श्री. नितीन निवंगुणे, बालाजी फुलारी, नितीन चव्हाण, व विघ्नेश कांबळी ह्यांनी अभिनंदन केले आहे.
मा. श्री रामकिशन मरिबा कलवले सरांचं वारजे, माळवाडी, शिवणे, उत्तम नगर परीसरात खूप अभिनंदन आणि गोड कौतुक होत आहे!!
