महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य मा. डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रयोगशील नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला
प्रतिनिधी गणेश तळेकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई तर्फे दरवर्षी सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन करण्यात येतो .
यंदा हा पुरस्कार कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रयोगशील नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांना
राज्यपाल मा. डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
राहुल भंडारे यांनी हा पुरस्कार आपल्या मातोश्री श्रीमती अंजना मधुकर भंडारे सह स्वीकारला.
याप्रसंगी *मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट राज्य तसेच मा. ना. श्री संजय शिरसाठ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र राज्य. हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते .
यांसह पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात
उपाध्यक्ष पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई आणि सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्वल निकम विश्वस्त पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई हे देखील उपस्थित होते
मा. ना. श्री रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री, भारत सरकार यांनी राहुल भंडारे यांचे अभिनंदन केले
