अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने जाहीर निषेध
गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाचा तीव्र आंदोलन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले ख्रिश्चन समाजाच्या वतीने आमदार पडळकर यांच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामध्ये ख्रिश्चन समुदायांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष जुबेर मेमन यांनी पडळकर यांच्या वक्तव्याचे जाहीर निषेध केला यावेळी जुबेर मेमन यांनी सांगितले कुठलाही समाज आणि धर्माच्या विरोधात कोणीही राजकीय नेता अशा वक्तृत्व केले तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करणार व त्यांना कठोर शासन व्हावे याकडे आम्ही पाठपुरावा करणार असे यावेळी सांगितले यावेळी या आंदोलनामध्ये पुणे शहर जिल्ह्यातून ख्रिश्चन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
