रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना पावसापासून संरक्षणासाठी छत्र्या भेट
स्नेहबंध’चा उपक्रम.
प्रतिनिधी- सारंग महाजन.
अहिल्यानगर – सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने छत्र्या भेट दिल्या.
हा उपक्रम स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
सध्या पावसाचे दिवस आहेत. रस्त्यावर राहणारे बेघर, निराधारांना दरवेळी पावसात भिजण्याची वेळ येते. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन स्नेहबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना छत्री देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्नेहबंधचे डॉ. उद्धव शिंदे यांच्यासह बालाजी वल्लाल, निशांत पानसरे, स्वयम बास्कर, प्रथमेश राठोड यांनी नगर शहरातील लालटाकी, जिल्हा शासकीय रुग्णालय, मार्केट यार्ड, न्यू आर्ट्स महाविद्यालय, सावेडी रोड, पाईपलाईन रोड व वाणीनगर परिसरात फिरून वंचित व गरीब गरजुंना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचे वाटप केले. छत्री भेट मिळाल्याने गरीबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.
स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने नेहमी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यातून खऱ्या गरजुंना मदत मिळावी, हा उद्देश आहे. गरीबांना आपल्या माध्यमातून मदत मिळावी, या हेतूने गरीबांना छत्री वाटप करण्यात आल्या.
(चौकट)
डॉ. शिंदे यांनी गोरगरिबांप्रती दाखवलेले प्रेम, जिव्हाळा प्रेरणादायी
स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी यांनी दिलेल्या छत्रीची किंमत पैशात मोजता येणार नाही. त्यामागे त्यांची असणारी तळमळ व भावना लाख मोलाची आहे. त्यांनी गोरगरिबांप्रती दाखवलेला प्रेम व जिव्हाळा निश्चितच प्रेरणादायी आहे, असे सांगून छत्री मिळालेल्या लाभार्थ्यांनी डॉ. शिंदे यांचे आभार मानले.
