किर्ला ग्रामपंचायतच्या कामात लाखोचा भ्रष्टाचार
(गावकऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार )
प्रतिनिधी नामदेव मंडपे मंठा /
(मंठा )
तालुक्यातील किर्ला ग्रामपंचायतच्या कामकाजात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत. गावातील काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत ग्रामपंचायतच्या निधीचा गैरवापर,तांडा सुधार वस्ती, दलित वस्ती, पाणि पुरवठा, सभागृह मातोश्री पांदन रस्ता कामातील अनियमितता आणि महत्त्वाच्या विकासकामांत घोटाळ्याबाबत तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीचा वापर सार्वजनिक कामांसाठी केला जाणे आवश्यक आहे, पण या निधीचा काही भाग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चुकीच्या प्रकारे लपवला जात आहे. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, शाळा आणि आरोग्य सुविधा यांसारख्या विकासकामांसाठी निधीमध्ये भ्रष्टाचारामुळे काम अपूर्ण राहिलेले आढळले आहे. यामुळे गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
१४ व १५ वित्त आयोग मातोश्री पादन रस्ता, तांडा सुधार वस्ती, दलीत वस्ती रस्ता, घरकुल, शेंड नेट, संभामंडप, पाणी पुरवठा कामाची कसुन चौकशी करून चौकशी पूर्ण होई पर्यंत कोणतेच देयके अदा करू नये दोषीवर कार्यदेशीर कार्यवाही करण्याची मागणी गावकर्यांनी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. निवेदनावर
आशिष चव्हाण,नारायण खंदारे, अकबर पठाण, विनोद राठोड, सचिन चव्हाण,सचिन राठोडसह आदींच्या सह्या आहेत
पांदन रस्ता कामात अनियमितता
रोजगार हमी मधून किर्ला ते भुवन पांदण रस्ता रस्ता २०२३-२४ मध्ये मंजुर झाला असून रोजगार हमी नियमानुसार व सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवून दिलेल्या अंदाज पत्रकानुसार काम न करता सरपंच, उपसरपंच, सरपंचाचे पती ग्राम रोजगार सेवक असुन पदाचा गैरवापर करून ग्राम सेवकावरती दडपण टाकूण त्या रस्त्याचे काम मुरूम खंडीकरण केले नसुन जे.सी.बी च्या सहाय्यने रस्त्या लगत नाली मारून त्या मधील काळी माती रस्त्यावर टाकूवन रस्ता केला आहे. बील काढण्यात आले असून तरी त्या रस्त्याची चौकशी होणे गरजेची आहे.
१४वा व १५वा वित्त आयोगात भ्रष्टाचार
ग्रामपंचायतीने १४ व १५ वित्त आयोगातुन प्राप्त झालेल्या निधीतुन शालेय साहित्य खरेदी न करता परसपर बोगस बिल लावून रक्कम उचलण्यात आली आहे.१४ वित्त आयोग व १५ वित्त आयोग २०२० ते २०२५ पर्यंत कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी.
घरकुलसाठी वसुली चालु
शासनाणे गोरगरीबसाठी किर्ला गावामध्ये ७० घरकुल मंजुर केले आहे. मात्र झालेले असून सरपंच पती व उपसरपंच हे पदाचा गैरवापर करून लाभार्थ्या कडून घराचे बील काढण्यासाठी प्रती लाभाथी २०००/- रूपये व घर न बांधता बिल काढण्यासाठी १०,०००/- रूपये ग्रामसेवक यांच्या नावाखाली लाभार्थ्याकडून वसुली करत असून ग्रामसेवकांना विचारले असता हे माझ्या नावाखाली असे करत आहेत त्याबद्दल मला कुठलीही माहिती नाही. दोषीवर कार्यवाही करण्यात यावी.
सिंचन विहीरीसाठी लुटमार
रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर मंजुर करण्यासाठी लाभार्थ्याकडून सरपंच पती रोजगार सेवक या दोन पदाचा गैरवापर करून विहीर मंजुरीसाठी २०,०००/- रूपये ची रक्कम लाभार्थ्याकडून घरातल्याचा आरोप करण्यात आला आहे
ग्रामसेवकाची मुजोरी
ग्रामसेवक मुख्यालय राहत नसुन गावामध्ये कधीच फिरकत नाही सतत फोन बंद ठेवतो त्यामुळे लोकांनी कामे वेळवर होत नसुन ग्रामसेवक यांची बदली करून नवीन ग्रामसेवक द्यावा .
