फुले शाहू आंबेडकरांचे खरे वैचारीक वारसदार कांशीराम जी आहे ऍड साहेबराव सिरसाठ पुरस्कार व सन्मान सोहळा संपन्न मिळाल्याने चळवळी ला गती मिळते
मनोज दांडगे
प्रतिनिधी- सारंग महाजन.
चिखली :- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली R. N. 534/F-1058/2009 द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम सुलोचना महिला आश्रम लताई अनाथलंय, भोकर ता चिखली जि. बुलडाणा च्या वतीने करवीर नरेश आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू जी महाराज यांच्या जयंती निमित्त सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी फुले शाहू आंबेडकर विचारधारेला अनुसरून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर 10 वी, 12 वी व इतर परीक्षेत उज्वल यश मिळवण्याऱ्या गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सोहळा तसेच, विवाह इच्छुक बौद्ध वधू वर परिचय मेळावा चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम चे उदघाटक मनोज दांडगे राष्ट्रवादी नेते तर अध्यक्ष ऍड साहेबराव सिरसाठ बहुजन विचारवंत तर प्रमुख मार्गदर्शक भाई कैलास सुखाने विदर्भ अध्यक्ष भीमशक्ती, अनिल नाना पळसकर जेष्ठ पत्रकार, प्रा. डॉ. सुभाष राऊत, कुणाल पैठणकर बामसेफ, प्रताप भांबळे अध्यक्ष संत कबीर पत संस्था, तर प्रमुख उपस्थितीत विकी शिनगारे अध्यक्ष फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती, राजेश गवई बामसेफ, जय सायराम त्रीदल संघ माजी सैनिक संघटना,विजय खिल्लारे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर पत संस्था मेहकर, एस. एस.गवई अध्यक्ष संबोधी ग्रुप, नितीन फुलझाडे,अध्यक्ष, तालुका पत्रकार संघ चिखली,दिपक मोरे पत्रकार,प्रताप मोरे पत्रकार,हिम्मतवंत जाधव दै. सम्राट, बाळू भिसे शहर अध्यक्ष वंचित हे होते.
फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा देशाच्या कानकपोऱ्यात नेऊन बहुजन समाजात जागृती केली म्हणून त्यांचे खरे वैचारिक वारसदार बहुजन नायक मान्यवर काशीराम आहेत असे मत ऍड साहेबराव सिरसाठ यांनी व्यक्त केले तर चळवळीत काम करणार्यांना पुरस्कार देणे व गुणवंताचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिल्याने ऊर्जा मिळते म्हणून असे कार्यक्रम झाले पाहिजे अस मत राष्ट्रवादी नेते मनोज दांडगे यांनी व्यक्त केले.
यावेळी 10 वी 12 वी व इतर परीक्षा मध्ये यश संपादन केलेल्या शेकडो विद्यार्थीचा सत्कार तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बहुजन चळवळ तेवत ठेवण्यासाठी अविरत संघर्ष करणारे बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या स्मृती प्रित्यर्थ बहुजन महापुरुषांच्या विचारधारेला अनुसरून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती ला बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी, प्रास्ताविक ऍड सी पी इंगळे यांनी आभार एस एस साळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईजी एन के सरदार, सतीश पैठणे, मनोज जाधव, रघुनाथ गवई, राजेंद्र सुरडकर, पत्रकार विजय खरात, गणेश श्रीवास्तव, दयानंद निकाळजे, यांनी परिश्रम घेतले.
