प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
आषाढी एकादशीनिमित्त जोगेश्वरी पूर्व येथील उत्साहात दिंडी यात्रा आणि पूजा
जोगेश्वरी, दि. ६ जुलै – सेवाभारती कोकण प्रांत ट्रस्ट (महाराष्ट्र भाग) संचालित ‘माता बाल आरोग्य आहार प्रकल्प’ अंतर्गत गांधीनगर बी वॉर्ड, जोगेश्वरी पूर्व येथे आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री साई सिद्धी मंडळाच्या परिसरात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संघटन मंत्रांनी झाली. त्यानंतर विठ्ठल-रखुमाई व भारतमातेच्या प्रतिमांची विधीवत पूजा, भजन व आरती करण्यात आली. उपस्थित लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून निलकंठेश्वर मंदिर, राम मंदिर आणि हनुमान मंदिर येथे दर्शन घेतले. नंतर रंगीत व सुसज्ज दिंडी यात्रा काढण्यात आली. शेवटी सर्वांना प्रसाद म्हणून केळी वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनंत राऊत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्ती साक्षीका संजय प्रियोळकर यांचे विशेष योगदान लाभले. तसेच, श्री साई सिद्धी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र केळकर, सचिव विवेक दळवी, शिवाजी सुर्वे, उदय मोरे, दीपिक गोहिल, योगिता वाघमारे, संस्कृती फणसे, सोनू चव्हाण, दीपिका ठाकूर, जान्हवी पेठावे, पिंकी परमार, सलोनी विचले यांच्यासह वस्तीतील अनेक महिला व पुरुष मंडळींनी परिश्रम घेतले.
या धार्मिक उत्सवामुळे वस्तीमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. लहानग्यांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला.
