अश्विनी राजेंद्र पाचारणे यांची राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते विशेष सन्मान
कलावती गवळी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
राजगुरुनगर (ता. खेड) पुणे जिल्हा:- राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी सौ. अश्विनी राजेंद्र पाचारणे यांची बिनविरोध निवड झाली असून, या निवडीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बँकेत प्रत्यक्ष येवुन त्यांचा पुष्पगुच्छ देवुन विशेष सत्कार केला. यावेळी डॉ. कोल्हेंनी अश्विनी पाचारणे यांच्या कार्यक्षमतेचे आणि सातत्यपूर्ण समाजकार्याचे भरभरून कौतुक केले.विशेष म्हणजे, सौ. अश्विनी पाचारणे या यावेळी विरोधी गटांतून निवडून आल्या होत्या, तरीसुद्धा सत्ताधारी गटातील प्रमुख संचालक श्री. किरण आहेर आणि इतर संचालकांनी मतभेद विसरून मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना उपाध्यक्षपदी विराजमान केलं. अशा प्रकारचा सहकारातील समजूतदारपणा आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान हे या निवडीचे खरे सौंदर्य ठरते.
अश्विनी पाचारणे यांचा राजकीय व सामाजिक प्रवास अत्यंत सक्रिय असून, त्यांचा महिलांसाठी विशेष कार्यक्षेत्र, ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण, आर्थिक साक्षरता यासाठीचा झपाटलेला प्रयत्न सतत चर्चेत राहिलेला आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला असून, त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या कामाची पावतीच म्हणावी लागेल.
याप्रसंगी बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “महिला नेतृत्व हे केवळ एक प्रतिनिधित्व नाही, तर समाजाला दिशा देणारी ऊर्जा आहे. अश्विनी पाचारणे यांचं नेतृत्व निश्चितच बँकेला एक नवी दिशा देईल.”या संधीने बँकेतील सर्व संचालकांनी एकात्मतेचा संदेश दिला असून, राजगुरुनगर सहकारी बँकेचा पुढील काळात विकास अधिक गतिमान होणार यात शंका नाही.
