खंडणीसाठी अपहरण करणा-या गुन्हेगारांना २४ तासात ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस.
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
चंदननगर : दि.३०जून २०२५ रोजी एक इसम हे कुबा मस्जिद जवळ वडगाव शेरी पुणे येथे कामावर जात असताना काही अज्ञात आरोपींनी त्यांना पळवुन नेऊन त्यांचे सुटकेकरीता फोनव्दारे २,००,०००/-रुपयांची मागणी केल्याने सदरबाबत त्यांची पत्नी हिने दिलेल्या तक्रारी प्रमाणे चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २४६/२०२५, भा.न्या.सं. कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा तपास सपोनि, विकास बाबर, चंदननगर पो.स्टे. पुणे यांच्याकडे देण्यात आला होता.
सदर गुन्हयातील पिडीत इसम व आरोपी यांचा शोध घेण्या करीता सी.सी.टी.व्हि. फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्याच्या आधारे पोलीस उप निरीक्षक अजय असवले, पोलीस अंमलदार शिंदे, लहाने यांनी माजलगांव जि. बीड येथुन १) गौतम केरुजी पोटभरे वय-३७ वर्षे, रा.मु.पो. राजेवाडीता. माजलगाव जिल्हा बीड २) अभिजीत वसंत पोटभरे वय २७ वर्षे, व्यवसाय शेती रा. मु पो. राजेवाडीता. माजलगाव, जि. बीड.३) शुभम वसुदेव मायकर वय २५ वर्षे, रा. मुकेंडे पिपरी पो. राजेवाडी ता. वडवणे, जि. बीड यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातुन पिडीत इसम यांची गुन्हा घडलेपासुन २४ तासाचे आत सुखरुप सुटका करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परि- ४ चे श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पो.स्टे. पुणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, तपासी अधिकारी सहा. पो. निरीक्षक विकास बाबर, पोउपनि अजय असवले, पोलीस अंमलदार हसन मुलाणी, शिंदे, लहाने यांनी केली आहे.
