फॉर्च्यूनर वाहन भाडेतत्त्वावर घेण्याच्या बहाण्याने अपहार करून फसवणूक करणा-या आरोपींवर.गुन्हे शाखा 6 पुणे यांनी केली कार्यवाही
प्रतिनिधी: आदित्य चव्हाण पुणे
पूणे :दि. ०५जुलै २०२५ रोजी युनिट ६ कडील पोलीस अंमलदार सचिन पवार यांना लोणीकंद पो. स्टे. ग. र. क्र. ४०९/२०२४, मा.द.वि. कलम ४०६, ४२० या गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी नाव आकाश रमेश पवार, वय २४ वर्षे, रा. फकीर जवळा, ता. धारूर, जि. बीड हा केसनंद, वाघोली, पुणे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, वाहिद पठाण, पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सारंग दळे, शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आहे. नमूद आरोपीताकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार आरोपी नाव किरण सुंदर घायाळ, वय ३२ वर्षे, रा. उरुळी देवाची, पुणे याच्या सह केल्याचे सांगितले व नमूद आरोपीतास उरुळी देवाची येथून ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यातील अपहार केलेले फॉर्च्यूनर वाहन व नमूद आरोपीतांनी अशाच प्रकारे छत्रपती संभाजी नगर येथून अपहार केलेले इटियॉस कार (क्रांती चौक पो. स्टे. येथे गुन्हा नोंद आहे) अशी दोन्ही वाहने मालेगाव, नाशिक येथे विक्री केल्याचे कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे (अतिरीक्त कार्यभार) श्री विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण गुन्हे शाखा युनिट ०६ पुणे शहर, पोलीस अंमलदार सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सारंग दळे, शेखर काटे व सुहास तांबेकरे यांच्या पथकाने केली.
