अंमली पदार्थ विरोधी पथक-२. गुन्हे शाखा, पुणे शहर यांची मोठी कार्यवाही
मेफेड्रोन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा इसमास केली अटक.
प्रतिनिधी: आदित्य चव्हाण
पूणे :दिनांक ०२जुलै २०२५ रोजी मा. वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेले बातमीवरुन अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर कोंढवा, पुणे येथे इसम नामे सुनिल बिश्नाराम चौधरी, वय २० वर्षे रा-खडी मशिन चौक, रीलायन्स मार्ट मागे, जनसेवा बैंके समोर, कोंढवा पुणे याचे ताब्यात एकुण १३,६०,०००/- रु.कि.चा ६७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम. डी.) असा अंमली पदार्थ, तसेच इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत सदर इसमाविरुध्द कोंढवा पोस्टे गु.र.नं.५१७/२०२५, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे. पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदिप जाधव, आझाद पाटील, साहिल शेख, अझिम शेख, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, यांनी केली आहे.
