मराठा प्रवाह समन्वय समितीचे श्री धाराजी भुसारे यांचा सत्कार
सामाजिक योगदानाबद्दल संदीप गव्हाणे पाटील मित्र मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
परभणी :आज आषाढी एकादशीनिमित्त मराठा प्रवाह समन्वय समिती अध्यक्ष तथा दैनिक लोकपत्र जिल्हा प्रतिनिधी श्री धाराजी भुसारे यांचा त्यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल आणि सामाजिक योगदानाबद्दल सत्कार सायकलस्वार आणि शिवभक्त संदीप गव्हाणे-पाटील आणि मित्र मंडळाने आयोजित केला. प्राध्यापक श्री एकनाथ मोरे पाटील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे पदाधिकारी यांनी मराठा प्रवाहाच्या वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन संदर्भात भुसारे सरांची प्रमुख भूमिका विशद केली. तसेच मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग काही अनुभव प्रसंग ही त्यांनी सांगितले अखिल भारतीय मराठा महासंघाचे जुने कार्यकर्ते म्हणून भुसारे सरांची ओळख आहे. अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी आणि शोधक पत्रकारितेद्वारे त्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका साखळी उपोषणादरम्यान मराठा समन्वयकांना मराठा सेवकांना गाव पातळीवर वाडी वस्तीवर समजून सांगितली होती.
विविध सामाजिक संघटनेच्या संपर्कात सर सक्रिय राहतात त्यांचे वय पाहता त्यांचा उत्साह वाखाण्याजोगा असतो यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यात मराठा प्रवाहाने रक्तदान, वृक्षारोपण, इतिहासाबद्दल जाणीव जागृती, असे उपक्रम राबवले होते. त्याची माहिती प्रास्ताविकात एकनाथ मोरे यांनी दिली. या याप्रसंगी अ्ड. सूर्यकांत मोगल यांचाही सत्कार करण्यात आला त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी एकनाथ मोरे, स्वप्नील बोर्डीकर , गणेश तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
