अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी आदित्य चव्हाण
शेतकऱ्यांच्या प्रति अपशब्द वापरणाऱ्या जालन्याचे आमदार बबन लोणीकर यांच्या विरोधात निरा शिवतक्रार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी पुणे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड, पुणे जिल्हा युवाध्यक्ष महेश जेधे, राजन पवार, संदीप चोंडकर, सचिन गायकवाड, विजय धायगुडे, संपतलाल भुजबळ, प्रवीण भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते सुधीर शहा, सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे आदी उपस्थित होते. यावेळी जय जवान जय किसान, भारत माता की
जय अशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन करताना आपच्या वतीने सांगण्यात आले की, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतः भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाडकी बहीण योजेनेचे आमिष दाखवण्यात आले. तसेच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ या अटीवर त्यांनी निवडणूक लढवल्या होत्या. परंतु आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे गाजर दाखवण्यात आले. तसेच जालना येथील भरसभेत आमदार लोणीकर यांनी मी तुमच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये देतो. तुमच्या आई- बहीण बायकोला प्रति महिना मी देतो, वर्षाला तुमच्या बापाला अठरा हजार मोदी देता. तुम्हाला सूट बूट कपडघासाठी आम्ही पैसे देतो. असे उद्गार काढले होते. त्यामुळे वक्तव्यांचा निषेध करण्यात आला, अप्रदाता शेतकऱ्यां बद्दल अपशब्द वापरून घोर अपमान केला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव नाराज असून बेणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका,
महानगरपालिका निवडणूक मध्ये शेतकरी विरोधी बीजेपी सरकारला त्यांची जागा दाखवू असे आपचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय गड यांनी बोलत निषेध व्यक्त केला.बबन लोणीकर तुम्ही आमचे बाप नसून तुम्ही आमचे सेवक आहात व आम जनता व शेतकरी हे मतदार राजा असून हेच तुमचे वाप आहे. शेतकऱ्यांनी ठरवले तर तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही अशी तीव्र भावना जिल्हा युवा अध्यक्ष महेश यांनीवक्त करत जाहीर निषेध वक्त केला बावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे, सुधीर शहा आणि टी के जगताप यांनी देखील भावना मांडत निषेध व्यक्त करण्यात आला. बीजेपी सरकार शेतकरी विरोधी सरकार अशा घोषणा देखील आपच्या कार्यकत्यांकडून देण्यात आल्या.
