AKS creations ,दर्शन क्रिएशन्स आयोजित
अद्वैत थिएटर्स निर्मित सर्वस्य निर्मित
प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई
विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा
अवघे गर्जे पंढरपूर
रविवार ०६ जुलै २०२५ दुपारी ४.०० वा. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर (प)
गायक -नचिकेत देसाई, संपदा माने,श्रीरंग भावे,स्वरा जोशी
संगीत संयोजन-कमलेश भडकमकर
निवेदन : दिपाली केळकर
वादक-अर्चिस लेले,कौस्तुभ दिवेकर,वैष्णव चव्हाण,राजेंद्र भावे
आयोजक- समीर बापर्डेकर, अभिजीत जोशी, राहुल भंडारे
विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा
मुंबई : देवशयनी आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त साधत अखंड विठ्ठलमय वातावरणात रसिक भक्तांना भक्तिरसात न्हालवणारा एक आगळावेगळा संगीत सोहळा — ‘अवघे गर्जे पंढरपूर’आहे.
अवघे गर्जे पंढरपूर’ हा कार्यक्रम केवळ एक संगीत सादरीकरण नसून, तो एका आध्यात्मिक अनुभूतीचा जागर आहे. अशा या पवित्र संगीतमय यात्रेचा लाभ घेण्यासाठी आणि विठुरायाच्या भक्तीने अंत:करण भरून टाकण्यासाठी, प्रत्येक भक्ताने ६ जुलै २०२५, रविवार, दुपारी ४ वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे उपस्थित राहून या सशुल्क कार्यक्रमाला भरभरून दाद द्यावी. नक्की या
