विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देत विद्यालयात उत्कृष्ठ खेळाडू घडवणार- अजित गावडे
टाकळी हाजी (शिरूर) : सुजित मैड
बेट भागातील टाकळी हाजी येथील मा. बापुसाहेब गावडे माध्य.उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर किकबॉक्सिंग स्पर्धेस निवड झालेल्या खेळाडू चा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला.
ऑल महाराष्ट्र किंक बॉक्सिंग स्पर्धेत राज्यपातळीवर कुमारी मिजबा शौकत मुजावर हीने फुल कॉन्टॅक्ट प्रकारात सुवर्ण पदक, कुमारी तनिशा शौकत मुजावर के वन प्रकारान सुवर्ण पदक प्राप्त करत चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली. या वेळी विद्यालयाचे प्रा.एस.एस.वाघमारे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळाबाबत मार्गदर्शन करत खेळांच्या माध्यामातून ग्रेस गुण कसे मिळतात ही माहिती सांगितली.
ग्रामीण भागातील विद्यालयाचे गरिब कुंटूबांतील दोन खेळाडू राज्य पातळीवर चमकत त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड होते ही उल्लेखनिय असुन विद्यालयाचे नाव राज्य नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर चमकावे म्हणून विद्यालयातील खेळाडूंच्या कला गुणाना वाव मिळावा म्हणून त्यांच्या सुप्त गुणांना शोधून शिक्षकांच्या मदतीने विविध खेळातील खेळाडूना प्राधान्य देवू तसेच विद्यालयाकडून शक्य तेवढी मदत करू वेळेप्रसंगी विद्यालयाला सहकार्य करणारे यांना भेटून शक्य तेवढी मदत घेण्याचा प्रयत्न करणार असुन दोन्ही खेळाडूना राष्ट्रीय स्पर्धेस पाठवणार आसल्याचे विद्यालयाचे व्यावस्थापक अजित गावडे सरांनी सांगितले.
सत्कार सोहळ्यावेळी शालेय शिक्षक एस.सी.गावडे,एम.पी.गावडे,आर. एम.चाटे मॅडम,डी.एम.निचित,
धुमाळ सर,पठारे सर,चौधरी सर, भोर मॅडम,के.एस.वाघमारे सर हे उपस्थित होते.माजी प्राचार्य खोमणे यांनी विद्यार्थीनीला प्रवासासाठी एक हात मदतीचा म्हणून सहकार्य केले. राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंना संस्थेचे संस्थापक माजी आमदार पोपटराव गावडे,संचालक राजेंद्र गावडे,सुनिताताई गावडे, शिरूर पोलीस स्टेशनचे पी.आय संदेश केंजळे,मा.प्राचार्य आर.बी.
गावडे,विद्यमान सरपंच अरुणाताई दामूशेठ घोडे,सर्व सदस्य,शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष धोडीभाऊ जाधव,पोलीस मित्र धोंडीभाऊ गावडे,हॉटेल विश्वपॅलेस उद्योग समुहाचे संस्थापकपै.तुकाराम
उचाळे, शांताई उदयोग समुहाचे दिलीपशेठ सोदक,युवा उद्योजक पै. प्रशांत चोरे आदरणीय पत्रकार बांधव संजय बारहाते,साहेबराव लोखडे,प्रविणजी गायकवाड,विजय लोखंडे,शुभम वाघचौरे,अरुणकुमार मोटे,सुजित मैड,योगेश भाकरे,द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे अध्यक्ष शकील मणियार,दै.
लोकशक्ती न्युजचे कार्यकारी संपादक इम्रान शेख सह संपूर्ण टीम,म्हसे,चांडोह,गुनाट,वडनेर शाखेचे शिक्षक,कर्मचारी सह ग्रामस्थ,पालक,विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या.
