अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जालना जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिनू पी.एम यांनी पदभार स्वीकारला
कर्तव्यदक्ष महिला ( आयएएस ) अधिकारी म्हणून ओळख
कलावती गवळी (जालना जिल्हा) प्रतिनिधी
महाराष्ट्रांतील 15 आयएएस ऑफिसरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, याबाबतचे आदेश दिनांक (2 जुलै ) रोजी काढण्यात आले असून लवकरच नियुक्त जागी रुजू होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, यामध्ये जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनीयार यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने मिनू.पी.एम. महिला ( आयएएस ) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे, तर मावळते सिईओ जगदीश मिनियार यांनी जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, नव्याने दाखल झालेल्या आयएएस अधिकारी मिनू पी.एम. यांचे मावळते सिईओ जगदीश मिनियार यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सोपविला, जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कायमच महिला ( आयएएस ) अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत गेल्या आहेत
