निराधार वृद्ध आजी ला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचा मिळाला आधार
प्रतिनिधी सारंग महाजन.
चिखली :- तालुक्यातील भोकर येथे निराधार बेघर बेसहारा अशा लोकांची सर्व प्रकारे मोफत व निःस्वार्थ सेवा देणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी एका गावातील 82 वर्षीय निराधार वृद्ध आजी आश्रय मिळून दिल्याने त्या आजीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सविस्तर असे कि भालगाव येथील वयोवृद्ध आजी गेल्या कित्येक वर्षांपासून वन वन भटकंती करत मंदिराचा सहारा घेत तिला दोन वेळच जेवण कोणी ना कोणी देत असे. ति नेहमी आजारी राहत असल्यामुळे तिची राहण्याची नीट नीटकी व्यवस्था नाही व तिचा मुलगा हा व्यसनाधीन असल्यामुळे तिच्याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नव्हते अशातच भालगाव चे सामाजिक कारकर्ते अमोल काकडे, कृष्णा परिहार व विजय परिहार यांनी त्या आजीची सर्व विचारपूस करून तुकाराम आश्रय वृद्धाश्रम चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना संपर्क केला. त्या आजीचे कोणीच नातेवाईक नसल्याने ग्रामपंचायत सरपंच यांचे कडून वृद्धाश्रम च्या नावाने शिफारस पत्र घेऊन आजीची पूर्ण माहिती चिखली पोलिसांत दिली व वृद्धाश्रमाच्या नियमानुसार त्या निराधार आजीला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश मिळून दिला. भालगाव चे सामाजिक कारकर्ते अमोल काकडे, कृष्णा परिहार व विजय परिहार यांनी त्या आजीला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमचा आधार मिळून दिल्याने यांची सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच आपल्या परिसरात कोठे ही असे निराधार वृद्ध आजी आजोबा, विधवा घटस्फोटीत निराधार महिला किंवा अनाथ बालके आढळून आल्यास मानवसेवा प्रकल्प च्या 8855850378 या नंबर ला संपर्क करा असे आव्हान संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.
