भारज येथील नागरी दवाखाना बनला भुत बंगला
भारज प्रतिनिधी राजेश दामधर
जालना जिल्हातील जाफराबाद तालुक्यातील भारज बु येथील नागरी दवाखाण्याकडे पदाधिकारी आणि अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे दिसत आहे
आरोग्य विभागाच्या नियोजन शून्य कारभाराने भारज परिसर आरोग्य सेवा पासून वंचित ……. जाफराबाद तालुक्यातील भारज या गावाला लोकसख्या जवळपास 10 हजार असून परिसरातील अनेक गावचा येथे दैनंदिन संपर्क असतो.2004 मध्ये जाफराबाद येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन केल्या नंतर येथील नागरी दवाखाना भारज येथे हलवण्यात आला होता. भारज येथे दवाखानाची इमारत सुद्धा तयार करण्यात आली.मात्र कर्मचारी ची नियुक्ती करण्यात आली नसल्याने दवाखान्याची दुरवस्था झाली आहे.शासनाने इमारतीवर जवळपास 1 कोटी 25 लाखाचा खर्च वाया गेला आहे …वरूड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने तसेच नवीन आरोग्य केंद्र उभारण्यासाठी 25 हजाराची लोकसंख्या असणे आवश्यक असल्याने सांगण्यात आले.यामुळे भारज येथे नागरी दवाखाना बंद करण्यात आला आहे.यामुळे रुग्णाला खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे
एकीकडे शासन ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याचा चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करित आहे.तर दुसरी कडे आरोग्य विभागाच्या शून्य नियोजन कारभारामुळे येथील नागरिकांना आरोग्य सेवा पासून वंचित राहावे लागत आहे……
सध्या सुरू सतत वातावरण मध्ये बदल असून लहान मुले आणि वयोवृद्ध भारज येथील नागरिक आजारी पडत असून आरोग्य विभागाच्या शून्य नियोजन कारभाराने रुग्णाचे हाल दिसून येत आहे .
