वंदनीय, दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर स्मृतीस्थळ, दादर चौपाटी येथील दुरावस्थे संदर्भात शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला केलेली मागणी मान्य
हिंदू धर्मरक्षक श्रीमान भागोजीशेठ कीर स्मृती समिती जय भागोजी, जय भागेश्वर वंदनीय, दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर स्मृतीस्थळ, दादर चौपाटी येथील दुरावस्थे संदर्भात समितीच्यावतीने आज गुरुवार दिनांक ३/७/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, दादर (पश्चिम) यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले होते.परंतु ते रजेवर असल्याने इन्चार्ज स्वप्नाली देवकाते मॅडम यांना निवेदन देण्यात आले.त्यांना भागोजींचे कर्तुत्व व दार्तुत्व आणि स्मृतीस्थळ येथील दुरवस्था कथन करण्यात आली.
त्यांनी तातडीने स्मृतीस्थळाला भेट दिली आणि कोणी गाडी पार्किंग करू नये किंवा असामाजिक व्यक्ती प्रवेश करू नये ही आमची मागणी मान्य करून पोलिस कर्मचाऱ्यांकडून बॅरिकेट्स लावून घेतले.देवकाते मॅडम यांनी आमचे बोलणे आस्थेने ऐकून घेतले आणि त्वरित ठोस कारवाई केली.
याप्रसंगी स्मृती समितीचे अध्यक्ष किशोर केळसकर, सचिव विलास कीर,उपाध्यक्ष दशरथ कीर, उपाध्यक्ष धनंजय कीर,उपाध्यक्ष रविंद्र मेणकुरकर, शशांक पाटकर, गणेश तळेकर, भारत पोखरे, विवेक पोलेकर, अजय नागवेकर, प्रकाश जाधव, संजय मयेकर इत्यादी भागोजी अनुयायी उपस्थित होते. आपले स्नेहांकित किशोर केळसकर (समिती अध्यक्ष) जगदीशआडविरकर (समिती समन्वयक) विलास कीर (समिती सचिव). उपस्थित होते
