मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीच्या वाईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या
वाई पोलिसांची कामगिरी
सौ. कलावती गवळी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
वाई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाई तालुक्यांत श्री. नवनाथ दत्त मंदिरांतील दानपेटी फोडून अज्ञात अंदाजे रोख रक्कम 6000 / चोरी झाल्याबाबत निरंजन रमेश पवार यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, त्या अनुषंगाने वाई पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे यांनी आपल्या पोलिस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या, पोलिसांनी नवनाथ दत्त मंदिर ते धोम गावाकडे जाणाऱ्या सी.सी.टीव्ही ची पाहणी केली असता, सदरची चोरीची घटना सी.सी.टीव्ही फुटेज मध्ये कैद झाली होती, मात्र पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करून आरोपीच्या मुसक्या आहेत, सदर संशयित आरोपी नामे. सचिन आनंदा नवघणे असल्याचे तपासात समोर आले तो मूळचा भोर तालुक्यांतील असून पोलिसांनी त्यास अटक करून श्री. नवनाथ दत्त मंदिरांतील रोख रक्कम 6000/ देखील पोलिसांनी जप्त केली आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिंम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पो. हवा अजित जाधव श्रावण राठोड पोलीस हेड हेमंत शिंदे नितीन कदम विशाल शिंदे राम कोळी अजित टिके यांच्या पथकांने केली आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करीत आहेत
