राष्ट्रप्रेम वाढवणारी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा हिंदू जनजागृती समितीचा संकल्प
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने लातूर येथील विष्णुदास मंगल कार्यालय येथे १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन
प्रतिनिधी अमोल गोरे लातूर
लातूर :- हिंदू जनजागृती समितीच्या वतीने लातूर येथील विष्णुदास मंगल कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, नवीन रेणापूर नाका, अंबेजोगाई रोड येथे गुरुपौर्णिमा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले असून गुरुवार, आषाढ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१२७ दिनांक १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता हा उत्सव संपन्न होणार आहे.
‘संपूर्ण विश्व युद्धाच्या दिशेने जात आहे. भारतातही जिहादी आतंकवादी हिंदूंची हत्या करून भारताला युद्धाकडे ओढत आहेत. अशा ‘युद्धकाळात प्रत्येक नागरिक सैनिक असतो’, हे लक्षात घेतले पाहिजे. श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या सारख्या अवतारांपासून ते छत्रपती श्री शिवाजी महाराज, श्री महाराणा प्रताप यांनाही जनतेवरील अन्याय नष्ट करण्यासाठी युद्धच करावे लागले.
त्या कार्यात त्यांना गुरुपरंपरेचेही मार्गदर्शन मिळाले. यातून राष्ट्ररक्षणासाठीही गुरु-शिष्य परंपरा आवश्यक आहे, हे लक्षात येते. त्यामुळे या वर्षी राष्ट्रप्रेम वाढवणारी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा संकल्प ‘हिंदु जनजागृती समिती’ ने केला आहे. या उत्सवात यथाशक्ती सहभाग घेऊन गुरुपरंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करता येईल !
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे स्वरूप खालील प्रमाणे असणार आहे.
महर्षि व्यास आणि गुरुप्रतिमा यांचे पूजन.
राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य करणाऱ्यांचा सत्कार.
संतांचे संदेश आणि कार्यकर्त्यांचे अनुभवकथन.
लघुपट, तसेच स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके.
रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक जप.
मान्यवरांचे वीरवृत्ती वाढवणारे विचार.
राष्ट्र आणि धर्म जागृतीपर प्रदर्शन.
तसेच साधना म्हणून राष्ट्र-धर्म रक्षण करणे अन् युद्धजन्य परिस्थितीतील आपली कर्तव्ये ! या विषयावर व्याख्यान होणार आहे.
अर्जुनरूपी हिंदु समाजाला धर्मसंस्थापनेसाठी प्रवृत्त करणाऱ्या जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महोत्सवाला अवश्य उपस्थित राहणेबाबत हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी हिंदू समाजातील नागरिक बंधू भगिनी आणि युवकासह या महोत्सवास आपले कुटुंबीय, तसेच मित्र यांसह सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहुन तन-मन-धन अर्पून गुरुपौर्णिमेला १ सहस्र पटींनी कार्यरत तत्त्वाचा लाभ घ्यावा, अशी विनंती व आवाहन केले आहे.
