ईश्वर कातकडे यांनी चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख
संभाजी पुरीगोसावी (चंद्रपूर जिल्हा ) प्रतिनिधी. चंद्रपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक ( आयपीएस ) पदावर कार्यरत असलेल्या रीना जनबंधू यांची आता नागपूर येथे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी बदली झाली असून, रीना जनबंधू यांनी चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या, त्यांना आता नागपूरसारख्या महत्त्वांच्या शहरांत गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी आता भंडारा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे ईश्वर कातकडे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे, भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या कामाचा अनुभव हा निश्चितपणे चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, त्यांच्या नियुक्तीने चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात नवीन ऊर्जा येईल आणि गुन्हेगारी नियंत्रणात अधिक यश मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे, चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाते, भंडारा जिल्ह्यातही अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहिले
