पुण्यात 50 वर्षीय आरोपीकडून मतिमंद मुलीवर अत्याचार खडक पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
कलावती गवळी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
पुण्यात मतिमंद मुलीवर 50 वर्षीय आरोपीने अत्याचार केला आहे, याप्रकरणी आरोपी शाम ज्ञानोबा हातागळे वय 50 रा. घोरपडी) या आरोपीला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पीडित मुलीच्या आजीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे, तक्रारदार ज्येष्ठ महिलेची 16 वर्षीय नात मतिमंद आहे, ती सोमवारी दुपारच्या घरासमोर खेळत होती, त्यावेळी आरोपी श्याम हातागळे तिथे आला त्यांनी मुलीला धमकावून त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने आजीला याबाबतची माहिती दिली, त्यानंतर आजीने खडक पोलिस ठाण्यात धाव घेवुन तक्रार दाखल केली, शाम हातागळे याच्या विरोधात मंगळवारी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत ( पोस्को ) गुन्हा दाखल करून त्याला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत,
