रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशलिस्ट चे अध्यक्ष श्री भाऊरावजी वानखडे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला
संपादकीय
दिनांक 1 जुलै 2025 ला पुलफैल , बौद्ध विहार वर्धा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशलिस्ट चे अध्यक्ष श्री भाऊरावजी वानखडे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी नेते धनंजय पाटील काकडे (ज्येष्ठ साहित्यिक व सरसेनापती शेतकरी आंदोलन समिती. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी वारकरी कष्टकरी महासंघ) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी श्री धनंजय पाटील म्हणाले — डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानात 18 जून 1951 ला बदलून संविधानाच्या गाभा बदलविला, पंडित जवाहलाल नेहरू हंगामी सभापती असताना त्यांनी पहिली घटना दुरुस्ती केली व शेतकरी शेतमजुरांच्या विरोधी कायदे तयार केले आणि या कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुद्धा जाता येणार नाही अशी मेख मारून ठेवली , त्यामुळे शेतकरी व मुजरांचे शोषण सुरू झाले व ग्रामीण व्यवस्था अडचणीत आली, म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मजुरांचे प्रश्न हे भिजत घोंगडे राहिले. 75 वर्षात 75 वेळा मूळ संविधान डॉक्टर बाबासाहेबांचे बदलविले. पहिल्या काळात काँग्रेसने बदलविले व नंतरचे काळात बीजेपी आपल्या सोयीने मूळ संविधान बदलविले, त्यामुळे त्या संविधानाची चिरफाड करून आपापल्या सोयीचे राजकारण करणे सोयीचे झाले. त्यासाठी मूळ संविधान जे 1950 साली डॉक्टर बाबासाहेबांनी सादर केले होते. ते मूळ संविधान लागू करावे. असे धनंजय पाटील काकडे म्हणाले.
या कार्यक्रमाला कम्युनिस्ट नेते सुरेश राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, युवक आधार ठाणे या वृत्तपत्राचे पत्रकार श्रीमती जोशनाताई करवाडे नागपूर हया सुद्धा उपस्थित होत्या. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रवक्ते श्री जितुभाऊ खान हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रम दुपारी तीन वाजता सुरू होऊन, सहा वाजता जितू भाऊ खान यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
