पुणे शहरांत नव्याने आलेल्या सहा पोलीस उपायुक्तांकडे नव्या जबाबदाऱ्या
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश
(संभाजी पुरीगोसावी ) पुणे शहर प्रतिनिधी
पुणे शहर पोलीस दलात नव्याने बदलून आलेल्या पोलीस उपायुक्तांना अंतर्गत नियुक्त देण्यात आल्या आहेत, तर सध्या आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या तीन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी हिंम्मत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत, मिलिंद मोहिते यांची विशेष शाखा, पुणे शहर येथून पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन या पदावर बदली झाली आहे, त्यांच्या जागेवर डॉ. संदीप भाजीभाकरे यांची विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, लातूरच्या पोलीस अधीक्षक पदावरून आलेल्या सोमय मुंडे यांची परिमंडळ चार येथे नियुक्ती देण्यात आली आहे, तर सिंधुदुर्ग येथून आलेले कृषिकेश रावले यांची परिमंडळ एकचे उपायुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे,रा.रा. पोलीस बल समादेशक दौंड येथून आलेल्या राजलक्ष्मी शिवणकर यांची पोलीस मुख्यालयात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, नव्याने दाखल झालेल्या सहा पोलीस उपायुक्तांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत
