हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील वाचन प्रेमी शाळेतील 75 अनाथ,एकल पालक विद्यार्थ्यांचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व.
प्रतिनिधी हिंगोली. श्रीहारी अंभोरे पाटील
वसमत येथीललिट्ल किंग्ज विद्यालयातील मुक्ताई सभागृहात एच.ए.आर.सी संस्थेचा स्तुत्य उपक्रम
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील ग्रामीण भागातील एकल पालक बालके व अनाथ बालके शिक्षणापासून अर्थात शैक्षणिक गरजांपासून वंचित राहू नये म्हणून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थे तर्फे वसमत तालुक्यातील ७५ एकल पालक व अनाथ बालकांना शैक्षणिक पालकत्व लोकसहभागातून करण्यात आले.
वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द,सोमठाणा, थोरावा,रायवाडी, गिरगाव, प्रशाला वसमत,नहाद, पळशी, राजापूर, टाकळगाव, दारेफळ, एकरूखा, लोण बु, निशाणा ता.औंढा या जिल्हा परिषद शाळेतील अनाथ व एकल पाल्याची पालकत्व स्वीकारून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्था परभणी तर्फे दि २७ जून रोजी ७५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले.असे आहे शैक्षणिक किट
लोकसहभागातून तयार होणाऱ्या या शैक्षणिक कीट मध्ये उत्तम दर्जाची स्कूल बॅग, एक डझन वही,एक डझन रजिस्टर,कंपास बॉक्स इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उजळणीची पुस्तके, चित्रकला वही असा एकूण संच असतो.
वसमत येथील लिट्ल किंग्स इंग्लिश स्कूलच्या मुक्ताई सभागृहात आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसमत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतिशजी काष्टे, प्रमुख अतिथी म्हणून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, माजी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले, संदीप वाघमारे सर, मारोती गोरे सर, लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालयाचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी
इत्यादींची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गजानन चौधरी यांनी केले. या प्रसंगी तानाजी भोसले, गटशिक्षणाधिकारी सतीशजी काष्टे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंजाजी जोगदंड यांनी केले तर आभार नागनाथ कालुरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एचएआरसी संस्था व वसमत तालुका वाचन चळवळ समन्वयक गजानन चौधरी मुंजाजी जोगदंड सर, कालुरे सर, खंडारे सर,संगेवार सर, चौंडे मॅडम, अलमले मॅडम, वळसे सर, बोधणे सर, अंभोरे सर, भस्के सर,सुरज कांबळे सर, कोटगिरे सर,कर्हाळे सर, सर्वेश माहुरकर
यांनी प्रयत्न केले.
कोट 2.एचएआरसी संस्था २०१० पासून शैक्षणिक किट वाटप हा उपक्रम राबवत असून यावर्षी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ऐकून ३४४ एकल पालक व अनाथ लाभार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक दायित्व म्हणून शैक्षणिक किटचे वाटप करण्यात येत असल्याचे एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी सांगितले.
