अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांनी संरक्षा पुरस्कार प्रदान केला
प्रतिनिधी सतीश कडू
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धर्म वीर मीना यांनी १.७.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांचा ज्यामध्ये मुंबई विभागातील २, सोलापूर विभागातील ३, नागपूर विभागातील २ आणि पुणे आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी १ कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्कार देऊन गौरव केला.
मागील महिन्यात संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यादरम्यान दाखवलेल्या सतर्कतेबद्दल, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येक पुरस्कारात पदक, प्रशंसापत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्र आणि ₹ २०००/- रोख रक्कम समाविष्ट आहे.
पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांचे तपशील
मुंबई विभाग
1. श्री निवृत्ती पांडुरंग म्हात्रे, हेड बुकिंग क्लर्क, दिवा, मुंबई विभाग, यांना १२.५.२०२५ रोजी किमी 44/100-200 येथे रेल्वेला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ दातिवली स्थानकाच्या केबिन स्टेशन मास्टरला कळवले आणि मोठी दुर्घटना टाळण्यास मदत केली.
2. श्री अमोल संतोष देवरे, रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी, अंबरनाथ, मुंबई विभाग, यांना २.६.२०२५ रोजी एक अंध व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून खाली पडताना दिसला आणि थोड्या अंतरावर रेल्वे ट्रॅकवर येत होती. श्री अमोल देवरे यांनी ताबडतोब त्यांच्या मदतीला धाव घेतली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीचा जीव वाचवला. त्यांच्या या जलद विचारसरणीने आणि कृतीने एक जीव वाचविण्यात मदत केली.
सोलापूर विभाग
3. १७.६.२२५ रोजी सोलापूर विभागातील अक्कलकोट रोडचे उप स्टेशन व्यवस्थापक श्री. बिरमणी बीर यांना लूपलाइनजवळ एका मालगाडीशी सिग्नलची देवाणघेवाण होत असताना वॅगनचा एक भाग लटकलेला दिसला. त्यांनी ताबडतोब धोक्याचा संकेत दाखवला आणि पुढील कारवाईसाठी ट्रेन थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
4. ढोकी, सोलापूर विभागातील उप स्टेशन व्यवस्थापक श्री. राजेश अजमिरे यांना १४.६.२०१५ रोजी निघणाऱ्या मालगाडीशी सिग्नलची देवाणघेवाण होत असताना दुसऱ्या गाडीच्या शेवटच्या वॅगनचा एक भाग लटकलेला दिसला. त्यांनी ताबडतोब लोको पायलटला कळवले आणि पुढील कारवाईसाठी ट्रेन थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
5. सोलापूर विभागातील पॉइंट्समन श्री. अतिश लांबतूरे यांना ५.६.२०२५ रोजी मालगाडी येत असताना एका वॅगनचा पिस्टन रॉड सैल लटकलेला दिसला. त्यांनी तातडीने सर्व संबंधितांना माहिती दिली आणि त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.
नागपूर विभाग
6. दि. २१.५.२०२५ रोजी नागपूर विभागाचे वरिष्ठ रेल्वे व्यवस्थापक श्री राकेश कुमार यांना मालगाडीची तपासणी करताना मागच्या ट्रॉलीचा बाह्य हेलिकल स्प्रिंग गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने संबंधित सर्वांना माहिती दिली आणि त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत झाली.
7. दि. २९.५.२०२५ रोजी हैदराबाद- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या नियमित रोलिंग तपासणी दरम्यान, नागपूर विभागातील तंत्रज्ञ (सी अँड डब्ल्यू) श्री विशु भीमराव डोफे यांना एका कोचच्या मागच्या ट्रॉलीचा ब्रेक डिस्क तुटलेला आणि बोल्ट नसलेल्या स्थितीत लटकलेला आढळला. त्यांनी तातडीने संबंधित सर्वांना माहिती दिली आणि त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत झाली.
पुणे विभाग
8. दि. १३.६.२०२५ रोजी पुणे विभागातील लोको पायलट श्री मयूर कांबळे यांना मालगाडीवर ड्युटी दरम्यान, चिंचवड लूपलाइनमध्ये प्रवेश करताना भिंतीचा एक भाग रेल्वे रुळांवर पडला असल्याचे लक्षात आले. त्याने ताबडतोब आपत्कालीन ब्रेक लावले आणि ट्रेन थांबवली ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
भुसावळ विभाग
9. दि. १६.५.२०२५ रोजी भुसावळ विभागातील सहाय्यक लोको पायलट श्री. मयूर सपकाळे, ट्रेन क्रमांक 03380 लोकमान्य टिळक टर्मिनस -धनबाद विशेष गाडीत मनमाड स्थानकावर कर्तव्य बजावत असताना, लोकोची तपासणी करताना त्यांना पॅन्टो प्लेटची आधार देणारी पट्टी तुटलेली आढळली. त्यांनी ताबडतोब संबंधित सर्वांना माहिती दिली आणि त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या कर्तव्यांप्रती असलेल्या सतर्कतेबद्दल आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक करताना, महाव्यवस्थापक म्हणाले की अशा सतर्कता आणि समर्पणाच्या कृतींमुळे इतरांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास आणि जीवितहानी, मालवाहतूक आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यास प्रेरणा मिळेल.
श्री. प्रतीक गोस्वामी, अतिरिक्त महाव्यवस्थापक, श्री. चंद्र किशोर प्रसाद, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी, इतर प्रधान विभाग प्रमुख आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
——–
दिनांक: १ जुलै २०२५
प्र. प. क्रमांक: 2025/07/01
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांनी जारी केले आहे.
