लातूरकरांचं भरभरून प्रेम मिळालं त्यामुळे जिल्ह्यात चांगल्या कामाची पोचपावती मिळाली :- पोलीस अधीक्षक सोमय मुंडे
लातूरकरांचं भरभरून प्रेम मिळालं त्यामुळे जिल्ह्यात चांगल्या कामाची पोचपावती मिळाली :- पोलीस अधीक्षक सोमय मुंडे
संभाजी पुरी गोसावी (लातूर जिल्हा) प्रतिनिधी.
लातूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला, नव्या पोलीस अधीक्षकांचे पोलीस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले, मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अमूल तांबे यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत पदभार सोपविला, मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची पुणे येथे बदली झाली आहे, लातूर जिल्ह्यात खूप समाधानकारक काम करता आले,
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक,जिल्हा पोलीस दलातील अधिकारी /अंमलदारांनी भरपूर सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आपल्या निरोप समारंभात प्रथमता: समाधान व्यक्त केले, लातूर जिल्ह्यात खूप चांगला अनुभव मिळाला खूप काही शिकता आले याबद्दल सोमय मुंडे यांनी आवर्जून उल्लेख केला, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत तर मावळत्या पोलीस अधीक्षकांना निरोपाचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये पार पडला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणे,प्रभारी पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते, लातूरकरांच्या सहकार्यामुळे अनेक चांगले उपक्रम जिल्ह्यात राबविता आले, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याला चांगले सहकार्य मिळाले जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था गुन्हेगारी कारवाया यावर चांगलाच वचक ठेवता आला याबद्दल मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी समाधान व्यक्त केले, लातूरकर व जिल्हा पोलिस दलातील अधिकारी,पोलीस कर्मचारी, अंमलदार माझ्या कायम आठवणीत राहतील असेही मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
