अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
अल्ताफ शेख यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी :आमदार चेतन तुपे पाटील, कोंढवा खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 200 मुस्लिम बांधवांचा जाहीर प्रवेश
कोंढवा खुर्द पुणे येथे समाजात काम करत असताना गेली 20 वर्ष जनसेवक अल्ताफ शेख यांनी कोणतीही जातपात न मानता सर्व घटकातील सर्व सामान्य लोकांना बरोबर घेऊन सामाजिक काम केले त्यांचा हा आदर्श समाजाला प्रेरणादायी आहे, असे मत हडपसर विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार चेतन तुपे पाटील यांनी व्यक्त केले.
कोंढवा खुर्द साईबाबानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश पथारी सेल अध्यक्ष, जनसेवक अल्ताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा खुर्द भागातील 200 मुस्लिम बांधवानी अजित दादा पवार (गट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार चेतन तुपे पाटील यांचा उपस्थित जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय तसेच प्रभाग क्रमांक 27 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाखेचे उदघाटन आमदार चेतन तुपे पाटील यांचा हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पथारी सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अल्ताफ शेख यांनी केले होते, यावेळी आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले कि कोंढव्याचा सर्वागीन विकासासाठी निधी कमी पडून दिला नाही नुरांनी कब्रस्तनच्या समोरील रस्ता देखील अल्ताफ शेख यांनी सांगून मला तो करून घेतला भविष्यात देखील या भागातील विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही असे तुपे यांनी सांगितले
कार्यक्रमांस माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण, रईस सुंडके, हाजी फिरोज शेख, युवा नेते पै. प्रसाद बाबर. पश्चिम महाराष्ट्र एकनाथ शिंदे गट शिवसेना कामगार संघटनेचे अमोल हुळवले,अनिस शेख, कसवा अमीर साहब, इरफान चाचा, अन्वर नाना, रिजवान शेख, अदनान अक्रम शेख, समिना मॅडम, आश्रफ खान,अमेय कारले, हाजी मुस्ताक भाई, हाजी अन्वर चाचा, निता गवळी,जोयेब काझी, प्रभाग 27 अध्यक्षा फराना अल्ताफ शेख, प्रभाग 27 च्या उपाध्यक्षा हमजा अल्ताफ शेख इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला, तरुण मुले, जेष्ठ नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला,
निता गवळी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रभाग क्रमांक 27 च्या उपाध्यक्षा हमजा अल्ताफ शेख यांनी मानले
हडपसर विधानसभा मतदार संघांचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या कार्याला प्रभावीत होऊन मी या भागात काम करत आहे राजकारण न करता राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करून जनतेचे प्रश्न कसे मार्गी लागतील याकडे मी लक्ष देणार असून भविष्यात लोकांना असणाऱ्या अडिअडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे जनसेवक अल्ताफ भाईजी शेख यांनी सांगितले
