अन्याय शासन निर्णयाच्या प्रतीकात्मक होळी
प्रतिनिधी दौलत सरवणकर
ठिकाण:- मुंबई. २९/०६/२०२५ रोजी मुंबई येथे मराठी अभ्यास केंद्र आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि समविचारी संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “अन्याय शासन निर्णयाच्या प्रतीकात्मक होळी” कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्यजी ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि पदाधिकारी ह्यांनी उपस्थिती दर्शवली
ह्यावेळी हिंदी सक्तीचा शासन निर्णय प्रतिकात्मकरित्या फाडून त्याची होळी करण्यात आली. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदीसक्तीला विरोध आहे, हीच भूमिका सर्वांची होती.
मराठी भाषेच्या अस्मितेवर गदा आणणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरोधात शिवसेना कायमच ठामपणे उभी राहणार. ह्या प्रसंगी समस्त मुंबईकर आणि शिवसैनिक आणि महिला आघाडी उपस्तिथ होते.
