सातारच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांची वारीमध्ये वारकरी रुपात गुन्हेगारांवर करडी नजर
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा )
श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात आगमन झाल्याने सातारा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे, त्या अनुषंगाने सातारा पोलीसही वारीमध्ये गुन्हेगारांवर वेगवेगळ्या रूपातून गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत, सातारच्या स्वता: अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम यांनीही वारकऱ्यांची विशेष काळजी घेवुन त्यांना कोणताही त्रास होणार नाही याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या तो माऊली रुपातील एक अप्रतिम फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना चांगलेच दिसून येत आहे…
