नवनीत कावत साहेब तुम्ही फक्त हाय-प्रोफाइल गुन्ह्यांचाच शोध लावणार असाल तर सामान्य नागरिकांनी दाद कुणाला मागायची
(बीड प्रतिनिधी): विवेक कूचेकर
बीड जिल्ह्यास आता खमक्या पोलीस अधिकारी येऊन सुद्धा, विविध प्रकारचे गुन्हे, घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. बीडला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून श्री. नवनीत कावत हे खमके अधिकारी रुजू झाले असले तरी मात्र हाय -प्रोफाइल गुन्ह्याचा शोध लावला जातोय किंवा त्याच गुन्ह्यात तत्परतेने गुन्हा नोंद होऊन कारवाई सुरु झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. बीड जिल्ह्यातील फक्त हाय -प्रोफाइल गुन्ह्यांसाठी फक्त पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत यांना रुजू करवून घेतले आहे असा समज सध्या सामान्य नागरिकांच्या मनात बळाऊ लागला आहे. घटना आणी गुन्हे हे हाय -प्रोफाइल अथवा उच्चभ्रू नागरिकांचेच घडत नाहीत तर सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या कुटुंबात देखील गुन्हे होत असतात. घटना आहे नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतल्या देवी बाभुळगाव या गावची. या गावात सचिन काशिनाथ ढवारे नामक मागासवर्गीय समाजातला तरुण मोलमजुरी करून राहतो. त्याची पत्नी नामे पूजा ढवारे /साळवे ही दि.10 जून रोजी तिच्या वडिलांसोबत म्हणजे बाबुराव साळवे यांच्या सोबत तिच्या माहेरी म्हणजे गोवर्धन हिवरा ता. परळी. जि बीड या ठिकाणी जाण्यासाठी देवी बाभुळगाव वरून बीड या ठिकाणे गेली. पूजा ढवारे/ साळवे ही बीडच्या बस स्थानकात पोहचताच आपल्या वडिलांना बाथरूमला जाऊन येते असं सांगून गेली. मात्र बराच वेळ ती माघारी न आल्यामुळे पुजाचे वडील बाबुराव गंगाराम साळवे यांनी संपूर्ण बस स्थानक परिसर पुजाच्या शोधार्थ पिंजून काढला. मात्र पूजा काही त्यांना मिळून आली नाही याबाबत पुजाचे वडील बाबुराव गंगाराम साळवे यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन आपली मुलगी पूजा ही अशा अशा प्रकारे गायब झाली आहे अशी रीतसर तक्रार दाखल केली आहे. परंतु शिवाजीनगर पोलिसांनी पूजा ढवारे /साळवे हिची मिस्सिंग ची तक्रार फक्त कागदोपत्री नोंद करून घेतली परंतु तीचा कसलाच शोध शिवाजीनगर पोलिसांनी घेतला नाही.तश्यात पूजा ढवारे / साबळे चा पती सचिन काशिनाथ ढवारे यास आपल्या पत्नीला पूजाला देवी बाभुळगाव याच गावात राहणाऱ्या अमरसिंह देविदास सालपे हाच पळवून घेऊन गेला आहे अशी माहिती मिळाली.पूजा ढवारे /साळवे ही आपल्या वडिलांसोबत माहेरी जाण्यासाठी निघाली खरी, परंतु बीड बस स्थानकात पोहचताच आपल्या वडिलांना ती बाथरूमला जाऊन येते असं सांगून अमरसिंह देविदास सालपे याच्या सोबत फरार झाली असल्याची खात्रीदायक माहिती पती सचिन ढवारे यास मिळाली असता. पुजाचा पती सचिन ढवारे सचिन ढवारे हा याबाबतची तक्रार दाखल करणार होता. मात्र सचिन ढवारे ची पत्नी मीच पळवून आणली आहे आणी तो आता माझ्यावर गुन्हा दाखल करणार आहे. अशी कुणकुण अमरसिंह सालपे यास लागली असता. अमरसींह सालपे हा पूजा चा पती सचिन ढवारे यास फोन करून आई -बहिणीवर अश्लील शिव्या देत होता आणी तुझी बायको मीच पळवून आणली आहे जा कुठे जाऊन केस करायची ते कर अशा धमक्या देत होता.दुसरी महत्ववाची गोष्ट ही कि, देवी बाभुळगाव या गावात मागासवर्गीय समाजाची कमी घरे आहेत त्यामुळे अमरसीह सालपे हा सचिन ढवारे यास जातीवाचक शिव्या देऊन ” तूम्ही महारं आम्हा पाटलाचं काय वाकडं करू शकतात, गावातून हाकलून देऊ तुम्हाला ” अशा धमक्या देतो आहे.आणी माझ्यावर जर अट्रासिटी चा गुन्हा दाखल जर केलास तर तुला आणी तूझ्या लेकरांना जिवंत सोडणार नाही असा दम तो देतो आहे.मुळात अमरसींह सालपे याचे रेकॉर्ड तपासले असता त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे उघड होत आहे.आपल्या पत्नीला पळवून नेले वरून तोच व्यक्ती आपल्याला आई बहिणीवर अश्लील शिव्या देतो आहे. त्यामुळे घाबरून सचिन ढवारे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत यांच्याकडे समक्ष जाऊन या सर्व प्रकरणाची तक्रार 20 जून रोजी दाखल केली आहे. मात्र या तक्रारी नंतर तर अमरसिंह सालपे हा जास्तच चिडून जाऊन सचिन ढवारे यास वारंवार फोन करून धमक्या, आई बहिणीवर शिव्या, आणी जातीवाचक शिव्या देऊन जीवे मारून टाकतो अशा धमक्या वारंवार देतो आहे. बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना समक्ष भेटून जर फिर्यादी आपल्या सोबत घडलेला प्रकार कथन करून तक्रार रुपी निवेदन देत असेल तरीही एका मागासवर्गीय समाजातील गरीब असणाऱ्या सचिन ढवारे याच्या पत्नीचा शोध बीड पोलिसांकडुन घेतला जात नाही ही शरमेचीबाब म्हणावी लागेल,अमरसिंह सालपे हा त्याच्या ज्या मोबाईल नंबर वरून फोन करून सचिन ढवारे यास अजूनही धमक्या देत आहे त्याचा शोध तांत्रिक रित्या घेऊन त्याला अटक केली जात नसेल तर मग, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक हे फक्त हाय -प्रोफाइल असणाऱ्या नागरिकांच्या गुन्ह्याचा शोध घेण्याकरीताच रुजू झाले आहेत काय? किंवा तेवढ्या पुरतच गृह विभागाने त्यांना बीड मध्ये आणले आहे काय? जर असे असेल तर मग सर्वसामान्य असणाऱ्या नागरिकांनी आपल्यावर झालेल्या किंवा घडवून आणल्या जात असलेल्या अन्यायाची दाद नेमकी आता मागायची कुणाकडे? या गरीब, मागासवर्गीय नागरिकांचा वाली तरी नेमका कोण? असा प्रश्न आता बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना पडला आहे.आणी शेवटी एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे सचिन ढवारे याला बीड जिल्हा पोलीस अधीक्षक खरच न्याय देतील काय?
