निर्मल नगरीच्या गजानन मंदिरात 31 वे सामूहिक पारायण संपन्न:
निर्मल नगरीच्या मंदिरात भक्तांची भरपावसात प्रचंड गर्दी :
नागपूर:सतीश कडू
श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३१ वे सामूहिक पारायणाप्रसंगी उमरेड रोडवरील निर्मल नगरीच्या मंदिरात, श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण रविवारी २९ जून रोजी, अतिशय सुंदर व आनंदात पार पडले. सकाळी ६ ते ११ या दरम्यान १ ते २० व्या अध्यायाचे पठण त्यानंतर ११:३० वाजता. २१ व्या अध्यायाचे सामूहिक पठण व गजानन महाराजांच्या आरती नंतर लगेच दुपारी १२ः३० वाजतापासून महाप्रसादाला प्रारंभ झाला. भक्तांनी पावसात प्रचंड गर्दी केली होती. भक्तांचे मन प्रसन्न होऊन आनंदाने महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
मंदिरात भजनांचा गजर ही गजर होता, जय राम श्रीराम जयजय राम, गण गण गणात बोते, या मंत्रांनी मंदिर दणाणून सोडले होते. श्रीराम भजन मंडळ सरस्वती नगर येथील महिला भजन मंडळाचे सहकार्य लाभले. यावेळी पंधराशेच्या वरील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. निर्मल नगरीच्या मंदिरात देवरावजी प्रधान आणि श्रीमती प्रतिभा प्रधान यांच्या हस्ते सुनील बालपांडे दादांचा व देविदासजी देशमुख दादांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व भक्तांनी एकत्रित येऊन सहकार्य केले. या सर्वांच्या मागे आयोजकांनी अथक परिश्रम घेतले असून यांच्याच प्रयत्नाने भक्तगण एकत्रित आलेले आहे. हे विशेष:
