पुन्हा चौसाळा बायपासला चोरट्यांचा हैदोस
शेतकऱ्याचे २२ लाखाचे डाळिंब गेले चोरीला
(चौसाळा प्रतिनिधी ) विवेक कुचेकर
बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील चौसाळा परिसरामध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे चौसाळा परिसरामधील नागरीकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मोकळा चोरटयाना मोकळा सोडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या शेतीमधील चौसाळा येथील शेतकरी सयाजी शिंदे यांच्या शेतातील सात एकरातील अंदाजे 22 ते 23 टन डाळिंब गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे याबाबतीत सयाजी शिंदे यांनी चौसाळा पोलीस चौकीला तक्रार दाखल केली असून सयाजी शिंदे यांचे अंदाजे 22 ते 23 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्यामुळे पुन्हा चोरट्यांनी शेतकऱ्यांना टार्गेट केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
चौसाळा परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे धुळे सोलापुर महामार्ग हा चोरट्याचा बालेकिल्ला झाल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या महीनाभरापुर्वीच धाराशिव येथील मोरे नामक व्यक्ती ला याच बायपासवरती लुटले होते तर चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांना देखील लुटण्याचा प्रयत्न झाला होता तसेच चौसाळा घारगाव रस्तया नजीक असलेल्या पांडुरंग कळासे यांच्या दहा शेळयाची चोरी झाली होती हे सर्व गून्हे प्रलंबित असतानाच शेतकऱ्याचे 23 लाख रुपयाचे सात एकरमधील डाळिंब चोरीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे पोलीस प्रशासन चोरट्यांचा शोध लावणार का? असा प्रश्न चौसाळा येथील नागरिक विचारताना दिसत आहेत
