वरखेडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “आनंददायी शनिवार” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना योगा, व्यायाम, बोधकथा व सामान्य ज्ञानाचे धडे.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे
२८/०६/२०२५ रोजी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वरखेडी येथे दर शनिवारी राबवण्यात येणाऱ्या “आनंददायी शनिवार” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना योगासन, प्राणायाम, व्यायाम, बौद्धिक व मानसिक विकासासाठी बोधकथा आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्नोत्तरे यांचेही नियमित मार्गदर्शन दिले जाते . विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यवर्धक सवयी निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे, या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमात *मुख्याध्यापक प्रमोद* *पाटील सर,प्रतिभा पाटील* *मॅडम, मनीषा* *पवार मॅडम,आणि अमोल पाटील सर* यांचे योग्य मार्गदर्शन आहे. त्यांच्या प्रेरणादायी सहभागामुळे उपक्रम प्रभावीपणे राबवला जात असून, विद्यार्थीही आनंदाने सक्रियपणे सहभागी होत आहेत.
प्रत्येक शनिवारी मुलांना योगा व शारीरिक व्यायामाबरोबरच नीतीमूल्ये शिकवणाऱ्या बोधकथा सांगितल्या जातात आणि सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्षमता वाढते .
मुख्याध्यापक प्रमोद पाटील सर म्हणाले,कि विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक
एकाग्रता आत्मविश्वास शिस्त
याचा विकास व्हावा, यासाठी ‘आनंददायी शनिवार’ उपयुक्त ठरतआहे.”
विद्यार्थ्यांनी योगाचे विविध प्रकार आत्मसात करत शाळेतील वातावरण अधिक सकारात्मक आणि आरोग्यदायी बनले आहे.
