पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतुन अंमली पदार्थाच्या दृष्परिणामा संबंधाने दिनांक २० जून ते २६ जुन हा आठवडा अंमली पदार्थ विरोधी जागरूकता आठवडा ऑपरेशन थंडर साजरा करण्यात आला
प्रतिनिधी: सतीश कडू नागपूर
नागपूर :सदर जागरूकता आठवडया दरम्यान पो. ठाणे बेलतरोडी हद्दीतील बेसा येथील “शुभारंभ हॉल” येथे व्यसन व त्यातुन यशस्वीरित्या कसे निघायचे याचे उपाय या विषयावर जनजागृती सभा पोलीस ठाणे बेलतरोडी व श्री रामकृष्ण बहुउद्देशिय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत करण्यात आली होती.
सदर सभेमध्ये प्रमुख वक्ता म्हणुन माजी पोलीस महासंचालक श्री भुषणकुमार उपाध्याय, बेसा पिपळा चे प्रशासक श्री भरत नंदनवार, श्री मुकुंद कवाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पो. ठाणे बेलरतोडी, डॉ. मोसम फिरके वरिष्ठ मानसोपचार तज्ञ, श्री रामकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सदस्य व समाजसेवक श्री मुकेश काळे, यांनी उपस्थितांना उपलब्ध असलेले महिला/पुरुष तरूण अंमली पदार्थांचे आपल्या शरिरावर व आपल्या जिवणांवर काय काय दुष्परिणाम होतात व त्यामुळे आपले कुटुंबीयाचे विशेष करून आपले मुलांच्या आयुषाचे कसे नुकसान होते याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले असुन सदर कार्यक्रमास काही व्यसनापासुन मुक्त झालेले नागरिक सुध्दा उपस्थित होते त्यांनी सुध्दा व्यसनामुळे त्यांचे शरिरावर काय काय दुष्परिणाम झाले व त्यांचे व्यसन सोडल्यापासुन त्यांचे जिवनात कोणते चांगले बदल झाले व त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुंटुंबीयाचे जिवनात काय आमुलाग्र बदल झाले याबाबत आपले अनुभव उपस्थितांसोबत केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. पोलीस उप आयुक्त, परि.क्र.४ रश्मिता राव, व सहा. पोलीस आयुक्त, अजनी विभाग श्री नरेंद्र हिवरे यांचे प्रमुख मार्गदर्शनात श्री मुकुंद कवाडें, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस उप निरीक्षक अच्युत रिंढे, पो.हवा. प्रशांत ठवकर, श्री रामकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सदस्य व समाजसेवक श्री मुकेश काळे यांनी मौलाचे सहकार्य केले.
