अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादकीय
भारतातील पहिला राजा ज्यांनी गरिबांच्या मुलांचा शिक्षणा साठी मोफत वस्तीगृह बांधली आणि कोल्हापूर राज्य वस्तीगृहाची जननी म्हणून ओळखल्या जाऊ लागली.एवढेच नव्हे तर नुसतं शहरातच शाळा असून गरिबांचे मुले शिकणार नाही म्हणून खेड्यापाड्यात शाळा उघडणारा पहिला राजा,
आपल्या भारतात सक्तीच्या शिक्षण कायदा २००९ साली लागू झाला पण राजांनी १९१७ मध्येच आपल्या राज्यात शिक्षण सक्तीचे केले. शेतकऱ्यांसाठी धरणे,मोफत बी-बियाणे,बाजारपेठेची निर्मिती,शेतकरी कारखानदार बनावा म्हणून सहकार तत्वाची स्थापना,कुलकर्णी पद नष्ट करून पगारी तलाठ्यांची निर्मिती केली,विधवा विवाह,आंतरजातीय विवाह कायदेशीर केले,सती प्रथा,हुंडा प्रथा बंद केले जातीचा नावाने लोकांना नोकऱ्या नाकारल्या जातात म्हणून नाकारला जाणाऱ्या जातींना ५० टक्के पहिल्यांदा आरक्षण देणारा राजा,पहिलवानांना,कलाकारांना आश्रय देणारा राजा.जेवढे सांगावे तेवढे कमीच असणारा राजा राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीच्या सगळ्यांना मंगल सदिच्छा
