युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी सौ.अनघलक्ष्मी दुर्गा यांची निवड.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.गणेश महाडिक यांच्या उपस्थितीत व मा.कांताभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड सिटी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनघलक्ष्मी दुर्गा मॅडम यांची युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.
सौ.अनघलक्ष्मी दुर्गा मॅडम याचा पुणे शहरात सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात भरपूर योगदान आहे यामुळे आरोग्य दूत म्हणून ओळखल्या जातात.
तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य अंतर्गत सयाजीराव गायकवाड मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मेहकर येथे संचालिका म्हणून कार्यरत आहेत, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा पदाधिकारी आहेत.अशा विविध संस्थेमध्ये अग्रेसर असतात याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत
प्रियंका नारी शक्ती पुरस्कार (मैं लड़की हूँ, लड़ सकती हूँ): ११ मार्च २०२४
लाईफ क्रिएचर पुरस्कार : २०२४
राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कारः ०८ फेब्रुवारी २०२५
राज्यस्तरीय उंच माझा झोका पुरस्कार : ०२ मार्च २०२५
राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार (जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर) 30 मार्च 2025
राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार (तथागत बहुउद्देशीय संस्था, मेहकर) 2025
मदर तेरेसा इंडियन एक्सलेन्सी अॅवॉर्ड 2025(Leading Role of Social Work & Aarogya Seva)
रवींद्रनाथ टागोर सन्मान 2025 (Media Section & Press Reporter)
राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार (सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था) २०२५
राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार (तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक) २०२५
14 “भारतीय छात्र संसद
(Indian Student Parliament Membership) 8” to 10″Feb 2025
युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार बांधवांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो व
त्या समाजाचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्या समस्या मार्गी लावल्या जातात
पत्रकार बांधवांच्या सोबत युवा ग्रामीण पत्रकार संघ नेहमीच तत्पर असते
