कर्मचाऱ्या अभावी गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा खिळखिळी.
डॉक्टरांच्या कमतरतेमुळे फार्मासिस्ट आणि चतुर्थश्रेणीचे कर्मचारी करतात उपचार.
कुरंडीमाल आरोग्य पथकातील घटना.
गडचिरोली / प्रतिनिधी दि. २५/६/२०२५:-
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता आहे आणि लोकांना चांगली आरोग्यसेवा मिळविण्यासाठी खूप दूरवर जावे लागते. जिल्ह्यात अनेक दुर्गम आणि आदिवासी वाड्या-वस्त्या आहेत, जिथे आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे.आरोग्य कर्मचारी नाहीत. असले तरी अनेक ठिकाणी डॉक्टरांचे मुख्यालयी राहाणे होत नाही. त्यामुळे, लोकांना आरोग्यसेवा देण्याचे काम फार्मासिस्ट, कंपाऊंडर आणि अन्य कर्मचारी करून आपले कर्तव्य बजावत आहेत. चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळवण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागतो,
जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नाहीत, त्यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.
काही ठिकाणी जनतेला आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा, जसे की ॲम्बुलन्स, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणे उपलब्ध नाहीत, ज्यामुळे आरोग्य सेवांचा दर्जा खालावला आहे.
दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठी जास्त अडचणी येतात, कारण तिथे पोहोचणे देखील खूप कठीण आहे. अनेक सरकारी आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे, लोकांना त्याचा पुरेपूर लाभ मिळत नाही,
जिल्ह्यातील गरिबी आणि कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे, लोकांना आरोग्य सेवांची जास्त गरज आहे, पण ती मिळत नाही.
एकंदरीत, गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी शासन प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी सरकारने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.असाच एक प्रकार आरमोरी तालुक्यातील भाकरुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुरंडीमाल आरोग्य पथक येथे झाला. फार्मासिस्ट पंकज होकम यांनी एका रुग्णांवर उपचार करून औषध दिले. पंकज होकम यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात चिट्टी लिहिली, रुग्णांची तपासणी करून प्रिक्शिप्शन लिहिले आणि औषधही दिले त्यामुळे हा प्रकार लक्षात आला. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी निवेदन दिले आहे
