ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा ‘जीवनगौरव’ने सन्मान !
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
बालगंधर्व रंग मंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेतर्फे आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविले. लीला गांधी यांच्यासारख्या कलाकारांचा गौरव हा केवळ व्यक्तीचा नाही, तर त्या शहराचा आणि क्षेत्राचाही गौरव असतो. त्यांच्यासारखे कलाकार हे पुण्याचे खाली की वैभव आहे
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याच्या पहिल्या दिवसात सहभागी होत, कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला. ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर, ज्येष्ठ समीक्षक श्री. जयराम पोतदार यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मान केला.
याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते-निर्माते श्री. प्रशांत दामले, ज्येष्ठ नेते श्री. उल्हासदादा पवार, डॉ. संजय चोरडिया, श्री. सिद्धार्थ शहा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे, बालगंधर्वचे प्रशासन अधिकारी श्री. राजेश कांबळे, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष श्री. मेघराजराजे भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
