ख्रिश्चन धर्मगुरूंना जिवे मारण्याची सुपारी देणारा व समाज समाजामध्ये भांडणासाठी प्रवृत्त करणारा गोपीचंद पडळकर ला विधानसभा सदस्य पदावरून बडतर्फ करावे:राजन नायर, सामाजिक कार्यकर्ता
(बीड प्रतिनिधी विवेक कुचेकर)
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज अनेक वर्षे पूर्ण झाली आहेत.भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने नांदत आहेत.पण काही समाज कंटक असे आहेत की,ते लोकांच्या मनात धर्म धोक्यात आहे, धर्मांतरण, इतर धर्मासाठी अश्लील भाषेचा वापर करून इतर धर्माविरोधी बोलणे अशा प्रकारे लोकांच्या मनात व्देष निर्माण करून एकमेकांविरूध्द उभे करून सामाजिक शांतता भंग करत आहेत.
मागील १० ते १५ वर्षे पासून कित्येक ठिकाणी चर्च ची तोडफोड, धर्मगुरू वर हल्ले करून समाजावर अतोनात अन्याय व अत्याचार सुरू झाला आहे. ख्रिस्ती समाज व शांती प्रिय समाज आहे. सर्व समाजाच्या विकासासाठी या समाजाचा मोठा वाटा आहे, सहभाग आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक माध्यमातून ह्या समाजाने सहकार्य केले आहे.
महाराष्ट्र, जो शिव शाहू फुले आंबेडकर यांनी घडविला ज्या महाराष्ट्रात सर्व जाती धर्मातील लोकांना एक नजरेने, एका स्तरावर पाहिले जाते, जे एकमेकांशी बंधु प्रेमाने राहतात अशा महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर सारखा व्यक्ती स्वतःला सुशिक्षित, सामाजिक नेता म्हणणारा व्यक्ती लोकांच्या मनात ख्रिस्ती धर्माविरोधात विष कालवून त्यांच्या अन्याय व अत्याचार करण्यासाठी तरूणांना प्रोत्साहन देत आहे. ख्रिस्ती धर्मगुरू कोणालाही धर्म स्विकारण्यास जबरदस्ती करत नाही. संविधान मध्ये दिल्याप्रमाणे धर्म बदलणे,स्विकारणे हे त्या व्यक्तीचा अधिकार आहे, त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. परंतु या *’धर्मांतरण’**शब्दाचा आधार घेऊन गोपीचंद पडळकर याने उघडपणे ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची सुपारी दिलेली आहे यातून त्याची गुंडप्रवृत्ती दिसून येते.
धर्मांतरण संस्कृती, संस्कार, विचारधारा, राहणीमान सोडण्यास प्रवृत्त करत नाही ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते. समाजामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या धर्माचा,भावनेचा आदर करतो पण गोपीचंद पडळकर याने आपल्या भाषणात उघडपणे उध्दट, शिवीगाळ भाषा, धर्मगुरूंना मारण्याची तरूण मुलांना फुस लावली.*(लव जिहाद करणारे हिरवे साप आहेत,तसे धर्मांतरण करणारे, सेवेच्या नावाखाली गोंडस दिसणारे हे अजगर आहेत.)**असे वक्तव्य केले सामाजिक वातावरण दूषित करणारे समाज कंटक विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी.
मा.मुख्यमंत्री साहेब आपणासोबत असणारे राम सातपुते यांनी सोलापूर येथे खासदार पद मिळावे म्हणून पंडिता रमाबाई संस्थेविरोधात व नितेश राणे याने मंत्री बनण्यासाठी मुस्लिम बांधवांना विरूध्द व्यक्तत्व केले.सरकार अशा लोकांना पाठीस घालते.
गोपीचंद पडळकर हा व्यक्ती फुकट प्रसिद्धी, मुख्यमंत्री व बिजेपी चे लक्ष केंद्रित करून मंत्री बनण्यासाठी ख्रिस्ती समाजावर घाणेरडे आरोप करत आहे अशा व्यक्ती वर लवकरात लवकर कार्यवाही करून त्याला अटक करून त्याचा विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा घ्यावा.
लोकशाही राज्यात ख्रिस्ती धर्मगुरूंना मारण्याची उघडपणे सुपारी दिली जात आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही धर्मगुरू ला काही झाले तर हा गोपीचंद पडळकर व्यक्ती जबाबदार राहिल.
ख्रिस्ती समाजाचे तरूण या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरल्यास महाराष्ट्रात कसे वातावरण निर्माण होईल याबाबत कल्पना नाही तरीही मुख्यमंत्री साहेब व गृहमंत्री साहेब आपणांस निवेदन आहे की, आपण या गोष्टी कडे दुर्लक्ष न करता अशा धर्माबद्दल व धर्मगुरूं बद्दल निच व्यक्तत्व करणार्या गोपीचंद पडळकर याचा राजीनामा त्वरित घ्यावा व त्याच्या विरोधात कार्यवाही करावी अन्यथा ख्रिस्ती समाजाचा आपणां प्रति असलेला विश्वास कमी होईल.
अल्पसंख्याक विभाग मंत्री दत्ता भरणे साहेब व अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे खान साहेब यांना विनंती आहे की गोपीचंद पडळकर या व्यक्ती पासून समाजाला धोका आहे तरी आपण याबाबत योग्य निर्णय घ्यावा.
मुख्यमंत्री साहेब याबाबत काही निर्णय घेतील असे वाटत नाही पण आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा आपणा कडून ख्रिश्चन समाज व अल्पसंख्याक समाज यांस खूप अपेक्षा आहे.
राजन नायर
राष्ट्रीय महासचिव
राष्ट्रीय ईसाई महासंघ
