फुरसुंगी पोलीस ठाणेच्या वरिष्ठ कर्तव्यदक्ष मंगल मोढवे यांची अचानक बदली, पोलीस ठाणे च्या परिसरांतील नागरिक भावुक
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
(पुणे शहर) फुरसुंगी पोलीस ठाणेच्या कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांची मध्यरात्री अचानक बदली करण्यात आली आहे, मात्र त्यांची बदलीचे कारण हे अजून पर्यंत गुलदस्त्यात आहे, पुणे शहर चे पोलीस आयुक्त यांच्याकडून बदली झाल्याचे समजते आहे, मात्र पोलीस ठाण्यात नवा कारभारी मॅडम माझ्याकडे पदभार द्या म्हणून पोलीस ठाणेत हजर… मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांच्या बदलीमुळे पत्रकार तसेच फुरसुंगी पोलीस ठाणेच्या हद्दीतील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, त्यांच्याबद्दल कोणतेही कारण व वादग्रस्त नसूनही नेहमीच प्रयत्नशील राहणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे सध्या नाराजीचा सूर आहे, त्यांच्या अचानक बदलीमुळे पत्रकार आणि परिसरांतील नागरिक देखील रस्त्यावर उतरले आहेत. मात्र पुणे शहर च्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांची बदली ही पोलटनिक विषय असल्याचे सांगत येत आहे. मात्र फुरसुंगी पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील असुनही अशा कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीमुळे परिसरांतील नागरिकांमध्ये देखील नाराजीचा सूर पाहिला मिळत आहे, त्यांच्या बदलीचे कारण अद्याप समोर नाही.
