शेतकऱ्यांचे तात्काळ विना शर्त पिक कर्ज मंजूर करा… (उबाठा) तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे
=============================
प्रतिनिधी:- नामदेव मंडपे मंठा
=============================
ऊसध्याला शेतकऱ्याची अवस्था म्हणजे “आई खाऊ देना आणि बाप भीक मागू दे ना” या उक्प्रमाणे झाली आहे.शेतकऱ्याच्या कोणत्या शेतमालाला हमीभाव मिळ नाही.महिन्याच्या सुरुवातीस पाऊस पडल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी जवळील किडुक मिडुक खर्च करून पेरणी केली आहे.मात्र मागील जवळपास पंधरा दिवसापासून पावसाने उघडीत दिल्याने बळीराजा चिंता तूर आहे.त्या मुळे राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना विना विलंब तात्काळ पीक कर्ज मंजूर करावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की,
मागील वर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून राज्य शासनाच्य वतीने पीक विम्याचे धरसोडीचे धोरण सुरू आहे.पिक कर्जासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर ही राज्य शासनाचे त्वरित कर मंजूर करण्याचे निर्देश असतानाही शेकडो अर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मंठा हे प्रलंबित ठेवत असल्याने आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढ होत आहे.त्या मुळे पीक कर्जा बाबत आलेले शेतकऱ्यांचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत. तसेच वरिष्ठ शाखांकडे मंजुरी करिता फाईल पाठवावी लागते असे सबत देऊन टाळाटाळ केली जात आहे. तर काही ठिकाणी तांत्रिक बाबी दाखवून पीक कर्ज नाकारले जात आहे.
अशा परिस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांना जाब विचारण्यासाठी बँकांची शाळा या आंदोलनात्मक कार्यक्रम राबविला जात असून शेतकऱ्यांचे पिक कर्ज त्वरीत मंजुर करावे, कोणतेही तांत्रिक कारण दाखवून पिक कर नाकारु नये, अशी मागणी करत तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे यांचे नेतृत्वात मंठा शहरातील बँकांना करण्यात आली असून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला तर उबाठा पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात शेवटी दिला आहे. या निवेदनावर आसाराम बोराडे, देविदास खरात, प्रल्हाद कदम, संजय बोराडे राहुल बोराडे सचिन चव्हाळ गणेशराव खराबे, रवी काळे, विलास खराबे, अमोल खराबे, प्रसाद सिंह सखाराम बोराडे ,जुनेद पठाण ,ठाकुर, रितिक जाधव, गजानन झोल, ऋषिकेश वाघ, दत्ता गोरे, सचिन घेणे,इलियास शेख, तानाजी मोरे, तन्वीर शेख, विष्णुपंत वरकड, शेख ऐसान,शंकर कचरे, गणेश घोडके, प्रदीप घोडके, भागवत खराबे, विकास खराबे, सोफियान पठाण, यांनी सह्या केलेले आहेत.
