एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बीड शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी चेन स्नोचिंग करणारे दोन आरोपी जेरबंद

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

बीड शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी चेन स्नोचिंग करणारे दोन आरोपी जेरबंद

प्रतिनिधी विवेक कूचेकर

दि.08/06/2025 रोजी फिर्यादी नामे ज्योति विजय उदावंत रा.उमरखेड ता.महागाव जि.यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन शिवाजी नगर येथे फिर्याद दिली होती की,दि.07/06/2025 रोजी फिर्यादी हया त्यांचे मुली सोबत नातवाचा साखरपुडा बीड येथे असल्याने त्यांचे भाऊ यांचे घरी आल्या होत्या.दि.08/06/2025 रोजी फिर्यादी व त्यांची मुलगी हया साखरपुडयाचे सामान खरेदी करण्यासाठी राजीव गांधी चौक येथे आल्या होत्या.दुपारी 03.00 वा दरम्याण फिर्यादी या ऍ़टो मध्ये बसत असताना फिर्यादी यांचे पाठी मागुन दोन अज्ञात ईसम मोटारसायकल वर बसुन आले व फिर्यादी यांचे गळयातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण किं.90,000/- रु हे हिसकावुन घेवुन गेले.अश्या वर्णनाच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला होता.तसेच पोलीस स्टेशन बीड शहर येथे दि.08/06/2025 रोजी फिर्यादी नामे शिल्पा अमोल वाव्हळ रा.फुलाईनगर ता.जि.बीड यांनी फिर्याद दिल होती की,फिर्यादी हया त्यांचे मुली सोबत खरेदी कामी डी.पी.रोड बीड येथे गेल्सा होत्या.फिर्यादी या त्यांची स्कुटी गाडी स्टॅन्डवर लावत असताना फिर्यादी यांचे जवळ तोंडाला बांधुन मोटार सायकलवर बसुन दोन ईसम आले .यातील समोरील ईसमाने डोक्यावर हेल्मेट घातलेले व अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट व काळी पॅन्ट व पायात पांढऱ्या रंगाचे बुट घातलेले दिसुन आले.व मागील ईसम हा काळया रंगाचे जरकीन घातलेला व डोक्यावर पिस्ता रंगाची टोपी घातलेला होती.यातील मागे बसलेल्या ईसमाने फिर्यादी यांचे गळयातील मिनी गंठण वजनी 13 ग्रॅम मागे बसलेल्या ईसमाने ओडुन घेवुन गेले यावरुन पो.स्टे. बीड शहर गु.र.नं 100/2025 कलम 304(2),(5) बी.एन.एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या दाखल गुन्हयांची माहिती पोलीस अधिक्षक नवनीत काँवत साहेब यांना मिळताचा त्यांनी सदरील गुन्हयातील आरोपींना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. स्थानिक गन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी लागलीचा पथके नेमुन बीड, आहिल्यानगर, छ.संभाजीनगर येथे रवाना केली. पोउपनि महेश विघ्ने यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की सदरचा गुन्हा हा आरोंपी नामे 1.सुमीत सुभाष रुपेकर वय 19 वर्ष रा.सजापुर वाळुज ता.जि. छ.संभाजीनगर 2.अजय संजय पंडीत वय 20 वर्षे रा.निपाणी वडगाव ता.श्रिरामपुर जि.अहिल्यानगर यांनी मिळुन केला आहे.व सदरचे दोन्ही आरोपी हे श्रीरामपुर येथे अशोकनगर भागात आहेत.यावरुन सदर श्रीरामपुर येथे जावुन दोन्ही ईसमांना ताब्यात घेतले.सदरचे दोन्ही आरोपीतांनी केले असल्याची कबुली दिली.सदर गुन्हयात गुन्हा करतवेळी वापरण्यात आलेली आरोपी क्रं.01 याची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.सदर आरोपीतांना पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.ऊर्वरीत मुद्येमालाचा शोध स्था.गु.शा.बीड व पो.स्टे.शिवाजीनगर करत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री नवनीत काँवत साहेब,पोलीस अधिक्षक सोहब बीड, मा.श्री सचीन पांडकर अप्पर पोलीस अधिक्षक बीड पोनि श्री शिवाजी बंटेवाड,स्थागुशा,बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, राहुल शिंदे, महेश जोगदंड, राजु पठाण, बप्पासाहेब घोडके, गणेश मराडे यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link