अनिगमित क्षेत्रातील आस्थापनांमध्ये आणि कुटुंबांमध्ये होणाऱ्या बांधकाम कार्यावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय नागपूरतर्फे आयोजन
नागपूर 23 जून 2025
प्रतिनिधी सतीश कडून नागपूर
भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय (क्षेत्र संचालन विभाग), प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांच्यातर्फे दोन दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 23 जून 2025 रोजी करण्यात आले. हे शिबिर राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय (क्षेत्र संचालन विभाग), केंद्रीय सरकार संकुल, ए-ब्लॉक, तिसरा मजला, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री श्रीनिवास उप्पला, उप-महानिदेशक, आंचलिक कार्यालय, नागपूर यांनी केले. या सर्वेक्षणाचा उद्देश असा आहे की, स्वतःच्या वापरासाठी (स्व-अकाऊंट) बांधकाम करणाऱ्या कुटुंबांकडून तसेच बांधकाम करणाऱ्या नोंदणीकृत नसलेल्या आस्थापनांकडून (अनिगमित आस्थापनांपासून) बांधकामासंदर्भातील माहिती गोळा करणे.
श्री रंगा श्रीनिवासुलु, संचालक व नियंत्रण अधिकारी, राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय (क्षे. सं. वि.), प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी उद्घाटन भाषणात उपस्थित मान्यवरांचे व प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत केले. आपल्या भाषणात त्यांनी या सर्वेक्षणाचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, या सर्वेक्षणाचे महत्त्व GVA (सकल मूल्यवर्धन) आणि GDP (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोजण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना आवाहन केले की, अशा सर्वेक्षणांची जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून व्यापक प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून योग्य व विश्वसनीय आकडेवारी संकलित करता येईल.
श्री श्रीनिवास उप्पला, उप-महानिदेशक, आंचलिक कार्यालय, नागपूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अनिगमित क्षेत्रातील आस्थापनांमध्ये व कुटुंबांमध्ये होणाऱ्या बांधकाम क्रियाकलापांचे आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आस्थापनांचा आणि कुटुंबांचा समावेश असतो आणि त्यांच्या सहकार्याची गरज आहे. हे सर्वेक्षण पायलट स्वरूपात राबवले जाईल आणि त्याद्वारे माहिती संकलित केली जाईल. त्यांनी सांगितले की, असमाविष्ट क्षेत्रातील उद्योजकांवरील (ASUSE) वार्षिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीचे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे महत्त्व आहे. तसेच त्यांनी सांगितले की, आस्थापनांमध्ये व कुटुंबांमध्ये कार्यरत बांधकाम कामगारांचे योगदान दर्शविणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सर्वेक्षणाची गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे आणि सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षण काळात संपूर्ण लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून क्षेत्रीय कार्य करताना गुणवत्तापूर्ण माहिती संकलित होईल आणि त्याचे सकारात्मक परिणाम सर्वेक्षणाच्या शेवटी दिसून येतील.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीनिवास उप्पला, उप-महानिदेशक, आंचलिक कार्यालय, नागपूर होते आणि आयोजक श्री रंगा श्रीनिवासुलु, संचालक व नियंत्रण अधिकारी, रा.सा.का. (क्षे. सं. वि.), प्रादेशिक कार्यालय, नागपूर होते. या वेळी व्यासपीठावर श्री एल.एम. जाडेजा, संचालक, आंचलिक कार्यालय, नागपूर; श्री निर्णय प्रताप सिंग, उप-संचालक, आंचलिक कार्यालय; श्री ए.जी. वागडे, सहाय्यक संचालक, आंचलिक कार्यालय; व श्री सुनील वैरागडे, सहाय्यक संचालक, प्रादेशिक कार्यालय हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुशील मोहन, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्र संचालन विभाग), प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री दीपक साहू, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्र संचालन विभाग), प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी केले.
