वाई एसटी आगारांच्या चालक टू वाहक स्वाती इथापे मॅडम प्रवाशांसाठी नेहमीच प्रयत्नशील
संभाजी पुरीगोसावी..!! (सातारा जिल्हा) प्रतिनिधी
कोण म्हणतं एसटी चालवणे महिलांचे काम नाही… आम्ही ते चॅलेंज स्वीकारतोय त्यासाठी आम्ही एसटी महामंडळात भरती झालोय, त्यामुळे सुरक्षित प्रवाशांसाठी एसटीचे स्टिअरिंग आमच्या हाती आले आहे, असा आत्मविश्वांस सातारा विभागातील वाई आगारांच्या चालक टू वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या स्वाती इथापे यांनी व्यक्त केला आहे, कोणतेही काम अवघड नसते, अशी खुणगाठ मनाशी बांधून त्या सन 2019 मध्ये एसटी खात्यात भरती झाल्या आहेत. त्या मूळच्या वाई तालुक्यांत चिंधवली गावच्या असून आपल्या पतीसह दोन मुलांसमवेत संसाराचा गाडा चालवत प्रवाशांच्या सेवेसाठी देखील त्या नेहमीच प्रयत्नशील आहेत. कुठे पण ड्युटी द्या: मी करणारच असा त्यांचा नेहमीच कयास आहे, पण त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीच ड्युटीसाठी एसटी खात्यातील वरिष्ठांना नकार दिला नाही, त्यामुळे त्यांचे वाई आगारांत चांगलेच नाव घेतले जाते, एसटी खात्यातील वरिष्ठांसह तसेच चालक वाहकांबरोबर तसेच प्रवाशांबरोबर देखील त्यांचा नेहमीच मनमिळावू आणि प्रेमळ आणि हसमुख स्वभाव नेहमीच आहे, त्यामुळे वाई तालुक्यांच्या ग्रामीण भागात देखील प्रवासी वर्गातून देखील त्यांचे नाव नेहमीच घेतले जाते, कधी चालक तर कधी वाहक म्हणून काम करत असताना एसटी बस मधील प्रवाशांकडून देखील त्यांना नेहमीच सहकार्य असते, सर्वसामान्य तसेच गोरगरीब आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी देखील त्या गाडीमध्ये असल्या की शिस्तीचे पालन नक्कीच करतात, चालक म्हणून ड्युटीवर असल्यावर गाडीतील प्रवासी आवर्जून त्यांना मॅडम तुमचा नंबर देता का..? अशी विनवणी करतात तर कोणी व्हिडिओ तयार करून आनंद व्यक्त करतात, आज रोजी सकाळी जिल्ह्याचे संभाजी पुरी गोसावी सातारकर हे महाबळेश्वर कडे जात असताना वाई आगारांच्या स्वाती इथापे यांची कर्तव्यावर असताना सदिंच्छा भेट घेतली यावेळी पुरी गोसावी यांनी जयहिंद… नमस्कार मॅडम तुम्ही प्रवाशांसाठी नेहमीच प्रयत्नशील असता असे म्हणत त्यांच्या उत्कृंष्ट सेवेबद्दल विशेष कौतुक केले
