सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांच्या कार्यालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांच्या नागपूर येथील कार्यालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली होती या चर्चा मध्ये पुणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी सहभाग घेतला, यामध्ये अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने, मुख्य सचिव रवी वेंगळे, सचिव सूर्यकांत यादव, सहसचिव बाबा गोणेवार,
एम एम जी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष परविन लालबिगे, तेजस्विनी सडेकर, विकी पाटील, रोहित चव्हाण, रवी भिंगानिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते,
यावेळी बैठकीदरम्यान हायकोर्टाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी, पर्वती जलकेंद्र कसबा पंपिंग स्टेशन व लष्कर पाणीपुरवठा सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मुद्द्यांसह अनेक अन्य प्रलंबित मागण्या यावेळी मांडण्यात आली,
संघटनेकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन समस्या सेवा सुरक्षा आर्थिक व सामाजिक हक्क यांवर सखोल चर्चा करण्यात आली, या संदर्भात शासन स्तरावर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी पुढील दिशा स्पष्ट करण्यात आले,
यावेळी सफाई मजदूर आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह उर्फ सतीश डागोर यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले,
